टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:41 PM2017-10-01T22:41:31+5:302017-10-01T22:41:49+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन’ कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन’ कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर आॅफ एक्सलन्स इन नॉनओव्हन डिकेटीई इचलकरंजीचे असिस्टंट डायरेक्टर अनिकेत भुते होते. ‘जेडीआयईटी’च्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, कार्यशाळा समन्वयक प्रा. राम सावंत आदी मंचावर उपस्थित होते.
सेंटर आॅफ एक्सलन्स हा केंद्राने चालू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एक आहे. देशभरात आठ आणि त्यातील चार प्रकल्प महाराष्ट्राला मिळाले आहे. टेक्सटाईल क्षेत्रात नवीन क्रांती आणण्यासाठीचे हे पहिले पाऊला मानले जाते. नॉनओव्हनमध्ये फक्त तंतूपासून कापडाची निर्मिती करता येते. दैनंदिन जीवनातील पाणी शुद्ध करावयाचे फिल्टर, पेट्रोल शुद्ध करावयाचे फिल्टर, गाड्यांमधील रूफिंग, डॅशबोर्ड आदी कामांसाठी या कापडाचा उपयोग केला जातो. नवीन रक्तनलिका, कृत्रिम हृदय यासारख्या शस्त्रक्रियेदरम्यानही त्याचा वापर होतो. यासारखे नवनवीन तंत्रज्ञान शोधायचे आणि विकसित करून ते समाजातील शेवटच्यास्तरावर पोहोचविण्याचे कार्य सेंटर आॅफ एक्सलन्स करते. तसेच या क्षेत्राशी निगडीत शासनाचे नवीन धोरण, प्रकल्प व नवीन योजनांचीही माहिती दिली जाते. याच सेंटरचे अनिकेत भुते यांनी या कार्यशाळेला संबोधित केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा ‘जेडीआयईटी’तील टेक्सटाईल विभागाच्या शंभरहून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी लाभ घेतला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी नॉनओव्हन मॅन्यूफॅक्चरिंंग टेक्नॉलॉजी या विषयातील उपयुक्तता त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनातील वापर, तर दुसºया दिवशी टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन या क्षेत्रातील रोजगार उपलब्धता व व्यवसायिकरण याविषयी माहिती दिली.
कार्यशाळेचे संचालन स्वप्नजा राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. सुरज पाटील, प्रा. मोनाली इंगोले, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल सम्रीत, चेतन वारंबे, वैभव पद्मशाली, प्रणौती म्हेस्कर, अभिलाष लांजेवार, अक्षय भोयरकर, भूमिका भलमे, विशाल सावंकर, अश्विनी आवारे आदींनी परिश्रम घेतले.