तेलंगणातील ठिबक महाराष्ट्राच्या माथी

By admin | Published: May 22, 2016 02:14 AM2016-05-22T02:14:18+5:302016-05-22T02:14:18+5:30

दोन राज्यातील अनुदानाचा फरक लक्षात घेता तेलंगणातील ९० टक्के सबसिडीवर मिळणारे ठिबक सध्या मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात भंगार...

Telangana Drip Maharashtra's forehead | तेलंगणातील ठिबक महाराष्ट्राच्या माथी

तेलंगणातील ठिबक महाराष्ट्राच्या माथी

Next

अनुदानाचा गोरखधंदा : चार हजारांच्या साहित्याची दोन हजार रुपयांत विक्री
संजय भगत महागाव
दोन राज्यातील अनुदानाचा फरक लक्षात घेता तेलंगणातील ९० टक्के सबसिडीवर मिळणारे ठिबक सध्या मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात भंगार विक्रेत्यामार्फत सहज उपलब्ध होत आहे. एका बंडलमागे चार हजार रुपये मोजण्याची गरज असताना भंगार विक्रेत्यांकडून ते दोन हजारात सहज मिळत आहे.
तेलंगणामध्ये ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना ठिबक मिळत आहे. तेच ठिबक महाराष्ट्रात ५० टक्के अनुदानावर आहे. तेलंगणात अनुदानाची रक्कमही लगेच दिली जाते. त्यामुळे ठिबक खरेदी करताना शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत नाही. विशेष म्हणजे एक लाख रुपयाच्या ठिबकसाठी १० हजार रुपये भरावे लागतात. त्याउलट महाराष्ट्र सरकारचे अनुदान धोरण आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वळती केली जाते. या योजनेत फायदा घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबकची खरेदी रक्कम पूर्ण भरून नेमून दिलेल्या कंपनीकडून खरेदी करावयाची आहे. खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला दाखवल्यानंतर शेतकऱ्याला सबसिडी देण्याची शिफारस कृषी विभागामार्फत करण्यात येते. ही लांबलचक प्रक्रिया असून २०१४-१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ठिबक योजना घेतली अशा एकट्या महागाव तालुक्यातील १५०० शेतकऱ्यांचे दीड कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळते झालेले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार केल्यास जवळपास २० कोटी रुपयांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे ठिबक योजनेकडे आता राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तेलंगणातील शेतकरी ९० टक्के अनुदानावर ठिबक घेवून भंगार विक्रेत्याला विकत आहे. ठोक विक्रेत्यामार्फत आयएसआय ट्रेडमार्क असलेल्या आणि ट्रेडमार्क नसलेल्या अशा दोन प्रकारच्या पाईपचा वापर केला जात आहे. अनुदानाच्या या गोरखधंद्यात आता जळगाव, खान्देश, नांदेड, जिंतूर येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात उतरले आहे.

Web Title: Telangana Drip Maharashtra's forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.