सांगा, आम्ही जीव सांभाळावा की दप्तराचे ओझे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:26 PM2019-01-01T22:26:19+5:302019-01-01T22:27:53+5:30

शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे होत असले तरी, शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. लोणी (ता.आर्णी) परिसरात विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी हा संघर्ष कधी थांबणार, हा प्रश्न आहे.

Tell us, should we guard our lives? | सांगा, आम्ही जीव सांभाळावा की दप्तराचे ओझे?

सांगा, आम्ही जीव सांभाळावा की दप्तराचे ओझे?

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा प्रश्न : आॅटोरिक्षाच्या टपावरून जीवघेणा प्रवास, शिक्षणासाठी असाही संघर्ष

विश्वजित मसारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे होत असले तरी, शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. लोणी (ता.आर्णी) परिसरात विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाच्या टपावर बसून प्रवास करावा लागत आहे. शिक्षणासाठी हा संघर्ष कधी थांबणार, हा प्रश्न आहे.
लोणी येथे प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षणाची सोय आहे. परिसरातील देवगाव, अकोला आणि खेड या गावातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या मार्गावर बसेसच्या दोन फेऱ्या आहेत. या फेºया शाळेच्या वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाने शाळा गाठावी लागते. आॅटोरिक्षाने प्रवास करताना जास्त प्रमाणात विद्यार्थी बसविले जातात. शेवटी काही विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाच्या टपावर बसून तर काहींना बाजूला लटकून प्रवास करावा लागतो.
मुलींकरिता मानव विकास मिशनने बसेसची व्यवस्था केला आहे. त्यामध्येही क्षमतेपेक्षा अधिक मुलींना बसावे लागते. मुलांना शिक्षणासाठी आॅटोरिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. शासनाकडून मात्र यासाठी प्रभावी अशा उपाययोजना केल्या गेल्या नाही. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेच्या दप्तराचे ओझे सांभाळावे लागते. शाळेत संच मान्यता टिकविण्यासाठी शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना मनधरणी करतात. आता मात्र हे शिक्षक आपले विद्यार्थी शाळेत कसे येतात अन् घरी कसे जातात याकडे दुर्लक्ष करीत आहे. शाळा संपल्यानंतर या शिक्षकांना बाहेरगावी असलेल्या घरी जाण्याची घाई असते. ही परिस्थिती लोणी गावातील दोन्ही शाळेत आहे.

Web Title: Tell us, should we guard our lives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.