यवतमाळचे तापमान ४६ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:44 PM2020-05-17T18:44:48+5:302020-05-17T18:45:10+5:30
उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे. शहरातील तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशावर पोहोचला आहे. सध्या लॉकडाऊनची स्थिती असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे उन्हाचा हा तडाखा जाणवत नाही.