दहा आरोपींना गुजरातमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 10:06 PM2017-11-07T22:06:41+5:302017-11-07T22:06:53+5:30
शहरातील पाटीपुरा परिसरात टोळी युध्द्धातून ‘वट्टा’ समर्थकांनी ‘अंकुश’ टोळीतील हनीचा खून केला होता. तेव्हापासून ही टोळी फरार होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील पाटीपुरा परिसरात टोळी युध्द्धातून ‘वट्टा’ समर्थकांनी ‘अंकुश’ टोळीतील हनीचा खून केला होता. तेव्हापासून ही टोळी फरार होती. शहर ठाण्यातील शोध पथकाच्या पाच अधिकारी, कर्मचाºयांनी दहा जणांच्या टोळीला गुजरातमधील दिंडोली येथून सोमवारी सकाळी अटक केली.
अश्विन ऊर्फ गोंड्या दीपक तेलंग (२४) रा. आंबेडकरनगर, सुहास अनिल खैरकार (२२), आदेश ऊर्फ आदया अनिल खैरकार (२०) दोघेही रा.अशोकनगर, मॅगी ऊर्फ रोहित विजय ओंकार (२०) रा. दलित सोसायटी, वैभव कृष्णराव नाईक (१८) रा. बांगरनगर, सुशील ऊर्फ धम्मा आनंद बनकर (२४), रोशन पुरूषोत्तम प्रधान (१८) दोघेही रा. अंबिकानगर, अनुप ऊर्फ दादू अनिल रामटेके (२२) रा. नगरपरिषद शाळेजवळ पाटीपुरा, सचिन ऊर्फ बत्या अशोक भोयर (१९) रा. आठवले ले-आऊट, नयन नरेश सौदागर (१९) रा. दिंडोली, संतोषनगर गुजरात, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी त्यांचा मित्र सुनील ऊर्फ वट्ट्या पवार, रा. तलावफैल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ३१ आॅक्टोबरला सायंकाळी अनिल ऊर्फ हनीसिंग विजय थूल (२७) याचा मिलींद गेडाम यांच्या घरात शिरून खून केला. या हल्ल्यात हनीसिंगचा मित्र प्रेमराज हा गंभीर जखमी झाला. अटकेतील आरोपींनी वट्ट्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ‘अंकुश’चा खून करण्याचा बेत आखला होता. मात्र घटनेच्या दिवशी तो हाती न लागल्याने त्यांनी हनीला संपविल्यानंतर आरोपी पसार झाले.
शहर पोलिसांना आरोपी वैभव नाईक हा काही दिवस सुरत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे डीबी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष इंगळे यांनी पाच कर्मचाºयांसह सुरत गाठले. नंतर मोबाईल सीमचे लोकशन स्ट्रेस करीत थेट गुजरातमधील दिंडोली गाठले. तेथे सोमवारी सकाळी तीन आरोपी त्यांच्या हाती लागले. नंतर उर्वरित सात जाणांना ताब्यात घेतले. ही कामागिरी एसपी एम. राजकुमार, अॅडीशनल एसपी अमरसिंग जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन क्षीरसागर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख, रवी आडे, नीलेश घोसे यांनी पार पाडली. तपास सहायक निरीक्षक विनोद झळके करीत आहे.
तलवारी चालविताना आरोपीही जखमी
हनीसिंगवर तलवारीने हल्ला करताना आरोपी वैभव नाईक हा गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला २२ टाके पडले आहेत. इतर दोघांची बोटे कापली आहे. सूड भावनेने पेटलेल्या आरोपींच्या हल्ल्यात हनीसिंगच्या दुचाकीची पेट्रोल टँकही सुटली नाही. यावरून तलवारीचे वार कितील घातक होते, याची कल्पना येते.