दहा गावे आली ड्राय झोनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:55 AM2017-09-18T00:55:07+5:302017-09-18T00:55:22+5:30
दगडी भाग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अविकसीत असल्याने नागालँड म्हणविल्या जाणाºया दारव्हा तालुक्यातील डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास दहा गावे यावर्षी अत्यल्प पावसामुळे ....
दारव्हा तालुका : सर्व पीक हातून गेले, पाण्याची भीषण समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : दगडी भाग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अविकसीत असल्याने नागालँड म्हणविल्या जाणाºया दारव्हा तालुक्यातील डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील जवळपास दहा गावे यावर्षी अत्यल्प पावसामुळे ड्राय झोनमध्ये आली आहे.
या भागातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी सर्व पीक हातून गेली आहे तर आत्तापसूनच पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा या गावांमध्ये आणीबाणीची स्थिती उत्पन्न होऊ शकते, अशी भीती व्यक्त केल्या जात आहे.
तोरनाळा (दगड) वागद, पिंपळखुटा, गोरेगाव, नांदगव्हाण, मांगकिन्ही, तेलगव्हाण यासह आजुबाजुच्या गावांमध्ये नेहमीच पाण्याची कमतरता असते. त्यातच यावर्षी दारव्हा तालुक्यात वार्षीक सरासरीच्या तुलनेत ५० टक्केसुद्धा पाऊस पडला नाही. त्यामुळे वरील गावांमध्ये नदी, नाले, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहे. कोरडवाहू शेतजमिनीला वरचे पाणी न मिळाल्याने खरीप हंगामातील सर्व पीक हातातून गेली. सोयाबीन करपल्याने सोंगायचेही काम नाही. कापसाला बोंड आले नाही, उडीद-मुगाचीही वाईट अवस्था झाल्यामुळे अनेक शेतकºयांनी शेती वाºयावर सोडली आहे.
शेतीच्या अशा अवस्थेनंतर आता या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची काळजी वाटत आहे. सर्वात भीषण स्थिती तोरनाळा गावात निर्माण झाली आहे. टॅँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाºया जिल्ह्यातील गावांमध्ये या गावाचा वरचा क्रमांक लागतो. गावात पाण्याचा एकही स्रोत नाही. सध्या कसीबशी पाणीपुरवठा योजना दुसºया ठिकाणाहून सुरू आहे. ही योजना बंद पडली तर या गावाला १० किलोमीटरवर असणाºया बोदेगावाहून टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही तर नांदगव्हाण, पिंपळखुटा येथील योजना बंद पडल्याचे सांगण्यात आले. या परिसरात आत्तापासूनच टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे या गावांकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. तेलगव्हाण येथील पाझर तलावात पाणी असून, आवश्यकता भासल्यास तोरनाळा गावाकरिता तेथून तात्पुरता पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. तसेच या गावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारा व इतर कामे होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाझर तलाव मंजूर करण्याची गावकºयांची मागणी आहे. पावसाअभावी टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने या गावांमधील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व आधिकाºयांना भेटून निवेदन सादर केले. त्यात त्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तात्काळ सर्वे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी त्वरित उपाय शोधण्याची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे पीक हातचे गेल्यामुळे लहान शेतकरी व शेतमजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, अशी मागणी आहे.
साठ वर्षांत प्रथमच भीषण दुष्काळ
यंत्रणेकडून दखल नाही
तोरनाळासह आजुबाजुच्या गावात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता समोर पिण्याच्या पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. अशी टंचाईग्रस्त स्थिती असताना अद्याप प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेतल्याचे दिसत नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आत्तापासूनच उपाययोजना केल्यास या गावातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो.
नदी, नाल्यांत ठणठणाट
गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच दुष्काळाची अशी स्थिती निर्माण झाल्याचे तोरनाळा-गोरगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शेषराव राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या भागातील कोणत्याही नदी, नाल्यांना थेंबभरही पाणी नाही. पीक तर गेली आता नागरिक आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.