अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:09 PM2019-04-23T21:09:18+5:302019-04-23T21:09:39+5:30
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवीले. तिच्यावर अत्याचार करून विकण्यचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवीले. तिच्यावर अत्याचार करून विकण्यचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील आरोपीला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
नरेश मोहन केराम रा. डोंगरखर्डा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १७ मे २०१७ मध्ये गावातीलच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. त्याने तिला उत्तर प्रदेशमध्ये बहिणीकडे ओलीस ठेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला विकण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार पिडीत मुलीच्या आईने कळंब पोलीस ठाण्यात दिली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक एस.एन.भगत यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहिउद्दीन एम.ए. (तीसरे) यांनी या खटल्यात सहा साक्षदार तपासले. त्यामध्ये डिएन.ए अहवाल, डॉक्टराची साक्ष तसेच पिडीत मुलीची साक्ष पुरावा म्हणून ग्राह्य धरली. यावरून आरोपीला कलम ३७६(२) व बाल लैगिंक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ प्रमाणे १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि १० हजार रूपये दंड ठोठावला. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी बाजू मांडली.