पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर ‘अपलोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:33 AM2018-02-13T00:33:57+5:302018-02-13T00:34:45+5:30
वणी शहरासाठी १५ करोड रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर सोमवारी ेसंगणकावर ‘अपलोड’ झाले.
आॅनलाईन लोकमत
वणी : वणी शहरासाठी १५ करोड रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे टेंडर अखेर सोमवारी ेसंगणकावर ‘अपलोड’ झाले. नगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात येणाºया नळयोजनेची निविदा २० फेब्रुवारीला उघडण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून वणीकरांना या नव्या नळयोजनेचे पाणी मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
वर्धा नदीच्या रांगणा डोहावरून ही पाईपलाईन घेण्यात येत आहे. वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर नळयोजनेसाठी शासनाने १५ करोड रुपयांचा निधी दिला. तब्बल १२ वर्षानंतर पहिल्यांदा वणीत पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
नवरगाव धरणात पाणीच नसल्याने वणीची पाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. पर्याय म्हणून राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा प्रयत्न सुरू असला तरी राजूर ते वणीदरम्यान टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला अनेक लिकेजेस आहेत. ते दुरूस्तीचे काम सुरू असली तरी पाण्याचा हवा तसा ‘फ्लो’ नदीपर्यंत येईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या शहरात आवश्यक त्या प्रभागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तोही अल्पप्रमाणात मिळत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे. टँकरने पाणी वाटले जात असले तरी हे टँकर अनेक भागात पोहचत नसल्याने महिलांमध्ये रोष आहे. दररोज कोणत्या ना वार्डातील नागरिक नगरपालिकेवर पाण्याचा मुद्दा घेऊन जात आहेत.
महिला कंत्राटदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नव्या नळयोजनेचे पाणी वणीकरांना निश्चितपणे मिळेल. त्यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मी वणीकरांना जो शब्द दिला होता, तो मी पूर्ण करून दाखविनच.
-तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष, वणी