सावळी सदोबा परिसरात तेंदुपत्ता तोडणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:14+5:302021-05-11T04:44:14+5:30

आर्णी : तालुक्यातील सावळी सदोबा परिसरात तेंदुपत्ता तोडणी हंगामाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिक सकाळीच जंगलामध्ये ...

Tendu leaf harvesting begins in Savli Sadoba area | सावळी सदोबा परिसरात तेंदुपत्ता तोडणीला सुरुवात

सावळी सदोबा परिसरात तेंदुपत्ता तोडणीला सुरुवात

googlenewsNext

आर्णी : तालुक्यातील सावळी सदोबा परिसरात तेंदुपत्ता तोडणी हंगामाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिक सकाळीच जंगलामध्ये जाऊन तेंदुपत्ता तोडणीच्या कामाला लागले आहेत.

कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीमध्ये तेंदुपत्ता संकलनातून नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांच्या हाताला काम नाही. प्रत्येक लहान-मोठ्या व्यवसायावर संचारबंदीचा परिणाम झाला आहे. बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. अशात तेंदुपत्ता संकलन सुरू झाल्याने नागरिक तेंदुपत्ता तोडायला जात आहे. त्यापासून मजुरांना आर्थिक मिळकत होत आहे.

सावळी परिसरामध्ये बऱ्याच गावांमध्ये तेंदूपत्ता पुडे बांधण्याची कामे सुरू झाली आहेत. या कामात लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सावळी सदोबा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. उन्हाळ्यात जंगलातील तेंदुपत्त्याची पाने यायला सुरू होते. जंगलाला लागून असलेल्या गावांतील नागरिक यातून बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती करतात. तेंदुपत्ता संकलनातून अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होत आहे. कठीण प्रसंगात कुटुंबावर आलेली उपासमारीची वेळ टळली आहे.

Web Title: Tendu leaf harvesting begins in Savli Sadoba area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.