नजरांचे’ वार सोसवेनात, त्यांच्यासाठी वसवले गाव ! गुरुकुंजनजीक साकारले ‘सांझाग्राम’
By अविनाश साबापुरे | Published: December 10, 2023 08:35 AM2023-12-10T08:35:41+5:302023-12-10T08:35:49+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर महिलांना हा ‘खुला आसमंत’ उपलब्ध झाला आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : महिलेवर शारीरिक अत्याचार झाला, की तिच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलून जातो. कायद्याने तिला न्याय मिळाला तरी ‘नजरांनी’ होणारे वार थांबत नाहीत. अशा महिलांसाठी जगापासून वेगळे असे एक स्वतंत्र गाव वसवले गेले आहे. सांझाग्राम असे त्याचे नाव असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरीपासून अवघ्या सहा किलोमीटरवर महिलांना हा ‘खुला आसमंत’ उपलब्ध झाला आहे.
मातृऋण वास्तू, २९ जणींचा पुनर्विवाह
पीडित ४५ वर्षांवरील महिलांसाठी सांझाग्राममध्ये ‘मातृऋण वास्तू’ उभारली जात आहे. सांझाग्रामला तीनच वर्षे झालीत, पण मानकर यांचे काम १५ वर्षांपासून सुरू आहे.
या काळात ७,३०० पेक्षा अधिक महिलांच्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले. तर २९ जणींचे पुनर्विवाह लावून दिलेत. अमोल मानकर यांच्या पत्नी जयश्री आणि मुलगी किमयाही सांझाग्रामच्याच रहिवासी आहेत, हे विशेष!
सांझाग्राम वसवणारे हे कुटुंब आहे तरी कोण ?
पीडित महिलांसाठी सांझाग्राम वसविणारे व्यक्ती आहेत अमोल मानकर. ते मूळचे अकोल्याचे. त्यांनी अकोल्यात वसतिगृह सुरू केले. ‘समर्पण’ च्या माध्यमातून २०२१ मध्ये अमरावती जिल्ह्यात गुरुकुंज मोझरीनजीक मालधूर येथे ‘सांझाग्राम’ वसविले.