लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 AM2022-04-08T05:00:00+5:302022-04-08T05:00:19+5:30

पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक्षरश: राठोड दांपत्याला घेरले. याच पाच मिनिटात त्यांनी बॅग धारदार वस्तूने कापून दागिने  बांधून असलेली पुरचंडी  बाहेर काढून घेतली. हा प्रकार राठोड दांपत्याच्या लक्षात आला नाही. मात्र महिला अधिकच लगट करीत असल्याने त्यांनी त्यांना खडेबोल सुनावले.

The couple, who were on their way to the wedding, flew around Rs 5 lakh worth of gold | लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले

लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर येथील शिक्षक  दाम्पत्य घाटंजी तालुक्यातील वासरी येथे लग्नाला जाण्यासाठी यवतमाळला आले. वर्धा येथून पाच महिलांची टोळी ट्रॅव्हल्समध्ये बसली. या महिलांनी रेटारेटी करीत बॅग कापून त्यातील पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी ४ वाजता दरम्यान घडली. यवतमाळातील लुटारू महिलांची टोळी विदर्भात कुप्रसिद्ध आहे. या टोळीचा हा कारनामा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 
पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक्षरश: राठोड दांपत्याला घेरले. याच पाच मिनिटात त्यांनी बॅग धारदार वस्तूने कापून दागिने  बांधून असलेली पुरचंडी  बाहेर काढून घेतली. हा प्रकार राठोड दांपत्याच्या लक्षात आला नाही. मात्र महिला अधिकच लगट करीत असल्याने त्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. नंतर राठोड दांपत्य यवतमाळात उतरले.
यवतमाळमध्ये त्यांनी बॅग उघडून बघितली असता त्यातील सोन्याची पुरचंडी आढळली नाही. दागिने घरीच राहिले असतील, असा संशय आल्याने खासगी वाहन करून ते तत्काळ नागपूर येथे पोहोचले. मात्र नागपूरातील घरीही दागिने मिळाले नाही, पुन्हा त्यांनी प्रवासाला घेतलेली बॅग तपासली तेव्हा त्या बॅगेला चिरा असल्याचे आढळून आले. नंतर प्रवासातील  पूर्ण घटनाक्रमच त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. ट्रॅव्हल्समधील प्रवासात त्या पाच महिलांनी कोंडाळे करुन गर्दीत बॅग कापली आणि बॅगमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेली पुरचंडी बॅगमधून  अलगद बाहेर काढली. या प्रकरणी पंकज राठोड यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
प्रवासात आढळलेल्या पाच महिलांचे वर्णन यवतमाळातील दारव्हा मार्गावरील एका वस्तीतील लुटारू महिलांच्या टोळीशी तंतोतंत जुळणारे आहे. मात्र अजून पोलीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांच्याही सतर्कतेची गरज आहे.

 लुटारू महिलांचा अनेकांना फटका 
- शहरासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये बसस्थानक अथवा प्रवासादरम्यान लुटणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय आहे. महिला असल्याचा फायदा घेत पुरुषांनाही ही टोळी गप्प बसविते. घाईगर्दी, धावपळ करून मौल्यवान ऐवज अलगद लंपास करते. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याचा सुगावा लागलेला नाही. संशयित महिलांना पाेलीस ताब्यात घेतात. परंतु मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागू देत नाही.
 

 

Web Title: The couple, who were on their way to the wedding, flew around Rs 5 lakh worth of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर