विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 07:35 PM2022-03-28T19:35:31+5:302022-03-28T19:36:03+5:30

चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

The death of two chimpanzees in the mud of a well; Drinking water is harmful | विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

विहिरीतील गाळात रुतून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पाणी पिताना झाला घात

Next
ठळक मुद्देगुराख्यामुळे दोघे बचावले 


यवतमाळ : चिमुकले पाच मित्र गुरे चारण्यासाठी गावशिवारात गेले होते. तहान लागल्याने एका शेतातील विहिरीजवळ गेले. त्यातील चौघे विहिरीत उतरले. पैकी दोघांचा गाळात रुतून मृत्यू झाला. वर थांबलेल्या एका मित्रामुळे दोनजण सुखरूप बचावले. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी मोहदा शिवारातील शेतात घडली. अक्षय मनोज पवार (वय १०) व रणजित श्रीराम भोसले (११, रा. किनवट, ता. कळंब) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे कळंब तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम भागातील किनवट गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षय पवार, रणजित भोसले, शिवम पवार (१०), रोहन घोसले (९), विरण पवार (७) हे पाचजण गावशिवारात गुरे चारत होते. दुपारच्या वेळी तहान लागल्याने ते कुंच्या मांडवकार भोसले यांच्या शेतातील विहीरीवर गेले. १२ ते १५ फूट खोल असलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असून, त्यात सहज उतरता येते, त्यामुळे चाैघे खाली उतरले. एकजण वर थांबला. यातील अक्षय व रणजित पाण्यात पडून गाळात फसले. हा प्रकार पाहून वर थांबलेल्या विरण पवार याने आरडाओरड केली. त्यावेळी जवळच असलेला गुराखी गंगाधर काळे (रा. किनवट) धावून आला. त्याने शिवम पवार व रोहन घोसले या दोघांना सुखरूप बाहेर काढले.

घटनेची माहिती होताच संपूर्ण गाव घटनास्थळी पोहोचले. कळंब पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली; परंतु घटनास्थळ त्यांच्या हद्दीत नव्हते. मोहदा येथील पोलीस पाटील पीयूष गब्रानी यांनी पांढरकवडा पोलिसांना कळविले. तेथील पोलीस दाखल झाले. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी संपूर्ण कारवाई पार पाडून अक्षय मनोज पवार (१०) व रणजित श्रीराम भोसले (११) यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. सोमवारी शवचिकित्सेनंतर मृतदेह किनवट येथे आणण्यात आले. दोघांवरही दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The death of two chimpanzees in the mud of a well; Drinking water is harmful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.