पोलीस उपमहानिरीक्षकांपुढे मांडली कर्मचाऱ्यांनी कैफीयत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 05:00 AM2022-03-26T05:00:00+5:302022-03-26T05:00:14+5:30
पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या गंभीर असल्याचे सांगितले. विकासकामासाठी येथील आरओ प्लांट हटविण्यात आला. त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पाण्याची समस्या निकाली काढण्याचे निर्देश मीना यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात पाेलीस दलाचे वार्षिक निरीक्षण सुरू आहे. शुक्रवार या निवेदनाचा शेवटचा दिवस हाेता. त्यानिमित्त पाेलीस संमेलन घेण्यात आले. यावेळी पाेलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी थेट उपमहानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्यापुढे मांडल्या. समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या गंभीर असल्याचे सांगितले. विकासकामासाठी येथील आरओ प्लांट हटविण्यात आला. त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पाण्याची समस्या निकाली काढण्याचे निर्देश मीना यांनी दिले.
उपचारावर झालेल्या खर्चाची देयके वेळेत निकाली काढली जात नाही. सहा ते १२ महिने वाट पाहावी लागते. अनेक महिन्यापासून उपचार खर्च मिळत नसल्याने अडचणी येतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर महानिरीक्षकांनी संबंधितांकडून रखडलेल्या देयकांचा आढावा घेतला. ही देयके तातडीने प्रक्रिया पूर्ण करून निकाली काढण्यास सांगण्यात आले.
जिल्हा पाेलीस दलात विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. विनंती अर्ज करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. काैटुंबिक व इतर याेग्य कारण असूनसुद्धा दिलासा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बदली प्रक्रियेत याेग्य कारणे ग्राह्य मानून दिलासा द्यावा, अशी मागणी उपमहानिरीक्षकांकडे केली. यावर याेग्य प्रस्तावाची पुनर्पडताळणी करून फेरबदलाचा निर्णय घेतला जाईल, असे उपमहानिरिक्षकांनी सांगितले. पाेलीस संमेलनात मुख्यालयातीलच कर्मचाऱ्यांची संख्या अधिक हाेती. त्यामुळे पाेलीस ठाणे स्तरावर काम करणाऱ्या अनेकांना सभागृहात बसता आले नाही. दाराबाहेर उभे राहून ते बाेलण्याची संधी मिळेल याची वाट पाहत हाेते. पाेलीस संमेलनापूर्वी उपमहानिरीक्षकांनी परेड निरीक्षण केले. शस्त्रागाराची, वाहन विभागाची पाहणी केली. इतरही शाखांना भेट दिली.
खुनाच्या घटना थांबवा : उपमहानिरीक्षकांचे निर्देश
- जिल्ह्यात २०२० व २०२१ च्या दाेन वर्षाच्या तुलनेत खुनाच्या घटना अधिक वाढत आहेत. यावर अंकुश लावण्याचे निर्देश पाेलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांनी दिले. खून झाल्यानंतर आराेपींना अटक करण्यापेक्षा ताे हाेऊच नये याची दक्षता घेण्यास सांगितले. पाेलीस संमेलनानंतर सर्व ठाणेदार, एसडीपीओ यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये विविध सूचना दिल्या. व्हिजिबल पाेलिसिंग करा, अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब घातक असून अपघात हाेणार नाही यासाठी उपाययाेजना करा, असे सांगितले. प्रतिबंधक कारवाया वाढवाव्यात, न्यायालयात गुन्हा सिद्ध हाेईल, असाच तपास केला जावा, दाेषाराेपपत्र सादर करण्यापूर्वी वरिष्ठांनी त्याची पडताळणी करावी, असेही मीना यांनी यावेळी सांगितले.