अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:00 AM2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:10+5:30

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.

The officer's two-wheeler was stolen from police station | अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली

अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :   बुधवारी पहाटे १९ वर्षीय चोरट्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दुचाकीचे लॉक तोडले. ती दुचाकी घेऊन तो पसार झाला. डायरी अंमलदार असलेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्याची ही दुचाकी होती. सकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकी चोरी गेल्याचे उघडकीस आले. 
पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. टीशर्ट घातलेला एक युवक  ठाण्यात आला. त्याने  दुचाकींचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पोलीस येतील याचा अंदाज येताच तो पोलीस ठाण्याच्या बाहेर आला. नंतर त्याने ठाणेदाराच्या कक्षामागून अरुंद बोळातून पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. तेथे बानते यांच्या दुचाकीचे लॉक तोडले व  दुचाकी घेऊन पसार झाला. हा घटनाक्रम पाहिल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेणे सुरू   केले. 
बुधवारी दुपारी एक वाजता दुचाकी चोरणारा सुरेश ऊर्फ जादू नरेश कलांडे (वय १९, रा. पारवा) हा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने हातावर ब्लेडने वार केले होते. स्वत:च्या आईच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकी चोर हाच आहे हे लक्षात येताच पोलिसांनी जादूला ताब्यात घेतले. काही वेळाने त्याची आई अनिता कलांडे ही पाेलीस ठाण्यात पोहोचली. 
मुलगा व्यवस्थित राहत नसून, तो वाद करून खोटी तक्रार देण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तसेच त्याने दुचाकी घरी आणल्याचेही सांगितले. मुलाचा कायमचा बंदोबस्त करा, त्याला कारागृहाबाहेर पडू देऊ नका, असे आर्जव अनिता कलांडे यांनी अवधूतवाडी पोलिसांकडे केले. 

होय गाडी चोरली, पोलीस माझे काय बिघडविणार
- सराईत चोर असलेल्या सुरेश ऊर्फ जादू कलांडेने चोरीची दुचाकी घेऊन पारवा  गाव गाठले. गावात जाऊन त्याने सर्वांना सांगितले, पोलीस माझे काहीच वाकडे करणार नाही, पोलिसाचीच दुचाकी  ठाण्यातून आणली आहे असे म्हणून जादूने स्वत:च्या आईसोबतच वाद घालणे सुरू केले. आधार कार्डासाठी टीसी हवी या कारणावरून तो आई व बहिणीसोबत भांडत होता. जादूच्या कारनाम्यामुळे कलांडे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. त्याने सायकल चोरीपासून गुन्ह्याची सुरुवात केली आहे. 

 

Web Title: The officer's two-wheeler was stolen from police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर