प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटाचा हार, वंचितचे निषेध आंदाेलन
By सुरेंद्र राऊत | Published: March 4, 2024 06:07 PM2024-03-04T18:07:24+5:302024-03-04T18:08:05+5:30
अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम केले जात हाेते.
यवतमाळ : शहरात बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव आहे. येथे अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा नाही, संगणकाची व्यवस्था नसून विद्यावेतन दिले जात नाही. या मुद्दावर वंचीत बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत थेट समाज कल्याण विभागातील प्रकल्प अधिकाऱ्याच्या गळ्यात नाेटांचा हार घालून साेमवारी निषेध आंदाेलन केले. त्यानंतर समाजक कल्याण अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नाेंदविला.
अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम केले जात हाेते. या गैरकारभारा विराेधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देऊन संबंधित यंत्रणेला जाब विचारला. तसेच सक्षम अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून त्यांच्या रिकाम्या खुर्चीला शाल आणि पुष्षहार अर्पण करून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्याला त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात पदाधिकाकऱ्यांनी नोटांचा हार घालून निषेध नाेंदविला.
अनुसूचित जातीचे शेकडो विद्यार्थी बार्टीमार्फत बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी करीत आहेत. सदर प्रशिक्षण हे मैत्रेय करिअर अकॅडमी या खाजगी कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकासह इतर मुलभूत सुविधांचा पुरवठाच केला नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय हाेत आहे. त्यामुळे त्यांचा सहा महिन्याचा कालावधी व्यर्थ गेला आहे. यांच्या निषेधार्थ डॉ निरज वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. याप्रसंगी शिवदास कांबळे, धम्मवती वासनिक, आकाश वाणी, कुंदन नगराळे, पुष्पा सिरसाठ यांच्यासह प्रशिक्षणार्थी रवी गोडघाटे, अमर भगत आयुष दिवे, गौरव चावरे, सिद्धांत नगराळे, आशिष बिहाडे, सुरज टिपकर प्रतीक तायडे, रविना बनसोड, आचल सहारे,क्षमा ढोके,साक्षी मिसळे, प्रणाली मुनेश्वर, नम्रता फुलमाळी, राजश्री लंबे,ओजस्विता चहांदे,, अंकिता कांबळे, भूमिका मिसळे,ऐश्वर्या दुर्योधन, अभय कळसकर,हर्षदीप बांगर, गुंजन धवणे, अर्पिता जवादे, आकाश भगत, अश्विनी साळोडे,अंकुश सालोडे, ऋषीकेष माहुरे,आदित्य कांबळे आदी उपस्थित होते.