सलग ७२ वर्ष एकच मतदारसंघ राखण्याचा विक्रम ; पुसदचा बालेकिल्ला इंद्रनील नाईकांनी राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:35 PM2024-11-24T18:35:38+5:302024-11-24T18:36:55+5:30
Yavatmal Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : ९० हजारांवर मतांची आघाडी : दहा उमेदवारांवर ओढवली अनामत रक्कम जप्तीची नामुष्की
अखिलेश अग्रवाल/प्रकाश लामणे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद :पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी एक लाख २७ हजार ९६४ मते घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शरद आप्पाराव मैद यांचा पराभव केला. ७२ वर्षांपासून पुसद मतदारसंघ नाईक परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे. प्रथमच इंद्रनील नाईक यांनी २० हजार ७६९ मतांची आघाडी घेत विक्रमी मते मिळवित बालेकिल्ला कायम राखला.
येथील बचत भवनात निवडणूक निर्णय अधिकारी आशिष विजवल व सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव जोरवर यांच्या मार्गदर्शनात मतमोजणीला सुरुवात झाली, महायुतीचे इंद्रनील नाईक यांनी एकूण २५ फेऱ्यांपैकी २४ फेऱ्यांपर्यंत आघाडी घेतली होती. निकाल जाणून घेण्यासाठी कार्यकत्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. सकाळपासून मुखरे चौकात निवडणूक निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार इंद्रनील नाईक यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले. यावेळी माजी आमदार निलय नाईक, मोहिनी नाईक, राजन मुखरे, उमाकांत पापीनवार, विनोद जिल्हेवार, धनंजय सोनी, सुनील ढाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. २०२४ च्या पुसद विधानसभा निवडणुकीत एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. मनसे, बसपासह दहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. तर वंचित आघाडीचे माधवराव वैद्य तिसऱ्या क्रमांकावर राहिले, महाविकास आघाडीचे शरद मैंद यांना एकूण ३७ हजार १९७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्या यांना ३६ हजार ५७५ मते, मनसेचे अश्विन जयस्वाल यांना १ हजार ६१४ मते, तर, बसपाचे शरद भगत यांना ८२४ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैहा है तिसन्या क्रमांकावर राहिले. २०१४ च्या निवडणुकीत प्रत्येक फेरीत महायुतीचे इंद्रनिल नाइकांनी आघाडी घेतली. पंधराव्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे शरद मैंद यांनी आघाडी घेतली होती. पुसद मतदारसंघात एकूण तीन लाख २१ हजार ८२६ मतदारांपैकी दोन लाख ११ हजार ९६० एवबंधा मतदारांनी मतदान केले होते. यात महायुतीचे इंद्रनील नाईक यांनी एक लाख २७ हजार ९६४ मते घेत दणदणीत विजय मिळविला. विजयाची घोषणा होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकत्यांनी गुलाल उधळत विजयी मिरवणूक काढली.
माजी मंत्री मनोहर नाईक किंगमेकर
२० नोव्हेंबरला मतदान झाले आणि सायंकाळी एक्झिट पोलची आकडेवारी यायला सुरुवात आली. यामुळे महायुतीच्या कार्यकत्यांचा विश्वास हा उंचावला होता. मतदान होईपर्यंत पुसदची जागा ही काटे की ठक्कर म्हणत असताना मतमोजणीनंतर अखेर पुन्हा एकदा किंगमेकर मनोहर नाईक यांची राजकीय खेळी यशस्वी झाली. त्यांचे सुपुत्र इंदनील नाईक पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत मनोहर नाईकांनी ५० हजार ४४४ मतांची विजयी आघाडी घेतली होती. २००४ च्या निवडणुकीत ४१ हजार ४२१ मते घेतली होती. २००१९ मध्ये ३० हजार ८४० मतांनी बाजी मारली होती, तर २०१४ च्या निवडणुकीत मनोहरराव नाईकांना रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ६५ हजार ३६१ मतांची आघाडी होती, तर २०२९ च्या निवडणुकीत इंदनील नाईक यांचा १ हजार ९२२ मतांनी विजय आला होता. या निवडणुकीत जुने सर्व रेकार्ड मोडीत काढले.
पोस्टल मते
महायुतीला महायुतीचे इंद्रनील नाईक यांना २०७३ पोस्टल मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे शरद मैंद यांना ४०५ पोस्टल मते मिळाली. यात ६८८ मताची इंदनील नाईक यांनी आघाडी घेतली. पंचितचे माधवराव वैद्य यांना ३९९ मते मिळाली. नोटाला १ हजार ३३० मते मिळाली, या मतदारांनी निवडणूक रिंगणातील तेराही उमेदवारांना 'नाही म्हणत नोटाचे बटन दाबले.
"मतदारांनी दाखविलेला विश्वास हेच माझ्या विजयाचे गमक आहे. जनतेची सेवा हेच आमचे ध्येय समजून राजकीय मार्गक्रमण करीत आहे. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही."
- इंद्रनील नाईक नवनिर्वाचित आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट