काय म्हणता... स्थानकातून बसच गेली चोरीला; घाटंजीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:37 PM2023-08-03T12:37:50+5:302023-08-03T12:38:43+5:30

अजबच घडले : चालकाने दिली थेट पोलिसांत तक्रार

The ST bus was stolen from the bus stop in ghatanji | काय म्हणता... स्थानकातून बसच गेली चोरीला; घाटंजीतील प्रकार

काय म्हणता... स्थानकातून बसच गेली चोरीला; घाटंजीतील प्रकार

googlenewsNext

घाटंजी (यवतमळा) : दररोज जिल्ह्यात अनेक प्रकारच्या चोऱ्या होता. मालमत्तेसह वाहने व दुचाकीही चोरीस जातात. मात्र, येथे भलतेच घडले. येथील बस स्थानकातून चक्क महामंडळाची बसच चोरीला गेल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

यवतमाळवरून बस (क्र.एमएच ४०/एन ९१४०) घेऊन चालक श्रीराम देशमुख व वाहक विजय बाभूळकर हे मंगळवारी सायंकाळी घाटंजीला निघाले. ते बस घेऊन येथील बस स्थानकात पोहोचले. बस मुक्कामी असल्याने, सर्व प्रवासी उतरले, नंतर चालक व वाहक नेहमीप्रमाणे सायंकाळचे जेवण करण्यासाठी बाहेर गेले. जेवण झाल्यानंतर आराम करण्यासाठी बसमध्ये असलेले बिस्तर आणण्यासाठी वाहक गेले. त्यावेळी जेथे बस लावली होती, तेथे बसच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहक बाभूळकर चक्रावून गेले. बघता-बघता बस चोरीला गेल्याची चर्चा सुरू झाली. संपूर्ण बस स्थानक व परिसरात बसची शोधाशोध करूनही बस दिसत नसल्याने अखेर चालक आणि वाहकाने पोलिस स्टेशन गाठले. बस (एसटी) चोरीला गेल्याची तक्रार चालक श्रीराम देशमुख यांनी दाखल केली.

ही बाब वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यात येथील पोलिस कर्मचारी नीलेश कुंभेकर हे राळेगाववरून घाटंजीकडे येत होते. त्यांना दुधाना गावाजवळील जंगलातून रस्त्याने विनालाइट बस जाताना दिसली. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी वाटसरूची मदत घेऊन बसचा पाठलाग केला. एके ठिकाणी त्यांनी बसला पकडले. बस चोरी करून घेऊन जाणारा भूषण बबन लोणकर (२९) याला त्वरित ताब्यात घेतले. त्याला बससह पोलिस ठाण्यात आणले. त्यामुळे बस चालक आणि वाहकाने सुटकेचा निश्वास सोडला. या प्रकरणी आरोपी भूषण लोणकर याच्याविरुद्ध भादंवि ३७९ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दारुड्या बस चालकामुळे प्रवाशंचा जीव धोक्यात

यवतमाळ-मांडवी बस चालकाने मद्य प्राशन करून बस चालविली. त्यामुळे ७५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ही घटना १ ऑगस्टला रात्री घडली. प्रवाशांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलाविले. त्यामुळे अनर्थ टळला. यवतमाळ ते मांडवी ही बस घाटंजीमार्गे १ ऑगस्टरोजी सायंकाळी यवतमाळ येथून मांडवी जाण्यासाठी निघाली होती.

Web Title: The ST bus was stolen from the bus stop in ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.