नकली बंदुकीच्या धाकावर दोघांनी केली लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:00 AM2022-04-11T05:00:00+5:302022-04-11T05:00:19+5:30

राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. टेंभी येथील दोघांनी आरडाओरड केली असता भामटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर भामट्यांनी महागावकडे पळ काढला.

The two robbed at gunpoint | नकली बंदुकीच्या धाकावर दोघांनी केली लुटमार

नकली बंदुकीच्या धाकावर दोघांनी केली लुटमार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : नकली बंदुकीचा धाक दाखवून दोन भामट्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फुलसावंगी ते महागाव दरम्यान घडली. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून दोन भामट्यांना रात्री १.३० वाजता जेरबंद केले. 
राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. टेंभी येथील दोघांनी आरडाओरड केली असता भामटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर भामट्यांनी महागावकडे पळ काढला. वाटेत डॉ. अमर मोतेवार यांच्या निवासस्थानी किरायाने राहणाऱ्या सचिन कोनादे यांच्या बुलेटचे (क्र.एम.एच.२४/बी.एम.३८८०) हॅन्डललॉक आणि वायरिंग तोडली. त्यांनी बुलेट पळवून नेली. शेजाऱ्यांनी आरडाओरडा करताच भामटे सुसाट वेगाने पळून गेले. 
या भामट्यांनी या घटनेपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास महागाव बसस्थानक परिसरात नकली पिस्तूल रोखून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटनांची माहिती मिळताच उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित ठाणेदार विलास चव्हाण यांनी लगेच महागाव गाठले. त्यांनी पोलीस पथकाला भामट्यांच्या शोधात रवाना केले. अवघ्या एका तासात हे भामटे सवना शिवारातील जंगलात आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून नकली बंदूक जप्त केली. दाेघांनाही पोलीस ठाण्यात आणून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डॉ. अमर मोतेवार यांनी तक्रार दिली आहे. 
त्यांच्या तक्रारीवरून राहुल भालेराव व आकाश मिरासे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची कसून चाैकशी सुरू असून इतर ठिकाणच्याही लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता  आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असून ठाणेदार विलास चव्हाण  यांनी सांगितले. हे भामटे नेमके कुठले याचाही शोध घेतला जात आहे. 

पोलीस अधीक्षक होते उमरखेडमध्ये 
ही घटना घडली त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उमरखेड आणि महागाव तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित होते. ठाणेदार चव्हाण यांनी डॉ. भुजबळ यांना माहिती देताच त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. महागाव पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना जेरबंद केले. 

आरोपींची कसून चौकशी सुरू
यापूर्वीही तालुक्यात काही ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे फुलसावंगी परिसरात या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा नकली बंदुकीच्या जोरावर लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title: The two robbed at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर