महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले; चार कि.मी. केला पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 09:01 PM2023-03-27T21:01:34+5:302023-03-27T21:02:08+5:30

Yawatmal News दुचाकीवर बसून निघालेल्या महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली. गावकऱ्यांनी चार किलोमीटर पाठलाग करून एकाला पकडले.

The two who snatched the woman's bag and ran away were caught four km. Chased | महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले; चार कि.मी. केला पाठलाग

महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोघांना पकडले; चार कि.मी. केला पाठलाग

googlenewsNext

यवतमाळ : दुचाकीवर बसून निघालेल्या महिलेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली. गावकऱ्यांनी चार किलोमीटर पाठलाग करून एकाला पकडले, तर बंदुकीच्या धाकावर पसार झालेल्या एकाला वरोरा (जि. चंद्रपूर) येथून ताब्यात घेण्यात आले. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. हिरा लक्ष्मण लिंगडे व शुभम खिरटकर (रा. वरोरा, जि. चंद्रपूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सहयोग मल्टीस्टेट को-ऑप बँकेच्या प्रतिनिधी असलेल्या कोसारा (ता. राळेगाव) येथील भारती संजय भेदुरकर या वडकी येथील सेंट्रल बँकेत आल्या होत्या. काम आटोपून दुचाकीवर मागे बसून गावाकडे निघाल्या. खैरी गावातील गोटाडी बसस्टॉपवर दुचाकीची गती कमी होताच मागून एका दुचाकीवर (एमएच २९ एएक्स ७६५६) आलेल्यांनी या महिलेची बॅग हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केल्याने बसस्टॉपवर असलेल्या युवकांनी दुचाकीने चोरट्यांचा पाठलाग केला.

खैरी गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दापोरा नाल्याजवळ चोरट्यांच्या दुचाकीत बिघाड झाल्याने ते थांबले. पाठलाग करणारे युवक पाहून चोरटे दुचाकी सोडून पळाले. युवकांनी पाठलाग करून हिरा लक्ष्मण लिंगडे (रा. वरोरा, जि. चंद्रपूर) याला पकडले. त्याचा साथीदार बंदुकीचा धाक दाखवून पसार झाला.

ग्रामस्थांनी वडकी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पकडण्यात आलेल्या हिरा लिंगडे याला दुचाकीसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा शोध वडकी पोलिसांनी सुरू केला. सहा तासानंतर दुसऱ्या आरोपीला माढळी (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथून अटक करण्यात आली. शुभम खिरटकर (रा. वरोरा, जि. चंद्रपूर), असे त्याचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The two who snatched the woman's bag and ran away were caught four km. Chased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.