पाळत ठेवून चोरी; महिला विस्तार अधिकाऱ्याचे घर फोडले
By विलास गावंडे | Published: October 4, 2023 10:18 PM2023-10-04T22:18:16+5:302023-10-04T22:18:57+5:30
ही घटना बुधवारी सकाळी येथील अशोकनगरात उघडकीस आली.
विलास गावंडे, नेर (यवतमाळ) : महिला विस्तार अधिकाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी येथील अशोकनगरात उघडकीस आली.
येथील अशोकनगरात वास्तव्याला असलेल्या शीला ओंकार वाघमारे (५१) या महागाव पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्या ड्युटीवर गेल्या. बुधवारी सकाळी ७:३० वाजता घरी परत आल्या. त्यावेळी त्यांना घराच्या दाराचे कुलूप फोडलेले दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केला. चोरी गेलेल्या दागिन्याची किंमत एक लाख ३८ हजार रुपये आहे. एकूण एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शीला वाघमारे यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर भादवी ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर खंदार करीत आहे.