जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 09:59 PM2019-04-14T21:59:03+5:302019-04-14T21:59:31+5:30

शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकही चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाला लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Theft in the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी

Next
ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : घरफोडी, चोऱ्या वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. एकही चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाला लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
चोरट्याने या कार्यालयाचे कुलूप तोडून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट जोडणीचे राऊटर लंपास केले. रविवारी सकाळी कार्यालयातील लिपिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी कार्यालयात पोहोचले. त्यांना प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले. आत संपूर्ण दस्तऐवज अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. या प्रकरणी सहायक दुय्यम निबंधक विजय देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचा गुन्हा नोंद केला. यापूर्वी चक्क जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानातून चंदनाचे झाड चोरीला गेले होते. प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांचे कार्यालय, निवासस्थानच सुरक्षित नाही. यावरून सामान्य माणसाची मालमत्ता किती सुरक्षित आहे, याची कल्पना येते.
सीसीटीव्ही कॅमेरे ठरतात कुचकामी
शहरातील अनेक प्रमुख चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. प्रत्यक्षात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतरच तो कॅमेरा बंद असल्याचे पोलीस यंत्रणेला माहिती होते. या सर्व कॅमेºयाचे कंट्रोल युनिट मुख्यालयात आहे. त्यानंतरही बंद कॅमेºयांची तत्काळ दुरूस्ती केली जात नाही.

Web Title: Theft in the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.