‘त्यांची’ प्राणज्योत तेवतेय रक्ताच्या थेंबावर

By admin | Published: June 14, 2014 02:34 AM2014-06-14T02:34:02+5:302014-06-14T02:34:02+5:30

रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे.

'Their' life is in the blood drops | ‘त्यांची’ प्राणज्योत तेवतेय रक्ताच्या थेंबावर

‘त्यांची’ प्राणज्योत तेवतेय रक्ताच्या थेंबावर

Next

रूपेश उत्तरवार यवतमाळ
रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. रक्ताचा संचय करणे अशक्य आहे. मात्र मर्यादित कालावधीसाठी हे रक्त टिकवून ठेवता येते. असे असले तरी गरजवंताच्या तुलनेत

ऐच्छीक रक्तदात्यांंची संख्या नगण्य आहे. त्यामुळे रक्ताचा भिषण तुटवडा निर्माण झाला आहे. रक्त पुरवठ्यावर जीवन विसंबून असणाऱ्या रूग्णांच्या जीवनाची नाळ

टांगनिला लागली आहे.
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐच्छीक रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मागणी कित्येक पटींनी वाढली आहे. मात्र

मागणीच्या तुलनेत रक्त पुरवठयाची संख्या सर्वात कमी आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तदानाचे कॅम्प, यासोबतच एनसीसी आणि अभियांत्रीकी महाविद्यालयासह अनेक व्यक्ती स्वत:हून रक्तदान करतात आणि रक्त पेढीतील

रक्तसंचयात भर पडते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते. उन्हाळ्यात ही संख्या रोडावते. यातूनच रक्त तुटवड्याचा भिषण प्रश्न

निर्माण होतो.
प्लाझमा सेंटरच नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातिल रक्त पेढीतून होलब्लडचा पुरवठा करण्यात येतो. मात्र रूग्णाला रेड सेल्स प्लाझ्मा लागल्यास तो रूग्णालयात मिळत नाही. त्यासाठी

खासगी रक्तपेढीतच धाव घ्यावी लागते. प्लेटलेट या ठिकाणावरून मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत खासगी रक्तपेढीधारक गरजवंतांना लुटतात.
खासगी रक्त पेढीतून प्लाझ्मा, होेलब्लड, लागल्यास त्याला पर्यायी ब्लड उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानंतर ठरावीक दरात रक्त पिशवी दिली जाते. मात्र पर्यायी रक्त

उपलब्ध नसल्यास रक्त पिशवीचा दर दुप्पट असतो. त्यासाठी जादा पैसे मोजले जातात. गरजवंताचा नाईलाज असतो.
राज्य संक्रमन परिषदेची मान्यता
ब्लड कम्पोनंट्स सेप्रेशन युनिट उघडण्यासाठी राज्य रक्त संक्रमन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याचा नकाशा मंजूर झाला आहे. त्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले

आहे. सात लाख रूपये यासाठी मंजूर करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्याला ६० लाखांची यंत्रसामुग्री मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात ब्लड

कम्पोनंटस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळण्यास मदत होणार आहे. यातून गरजवंतांची होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे.
सिकलसेल, थॅलेसिमीयाचे रूग्ण संकटात
विदर्भात सिकलसेल आणि थॅलेसिमीयाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळ जिल्हयात आहे. या रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. असे एक हजार रूग्ण रजिस्टर करण्यात

आले आहे. रक्तपेढीतील तुटवड्याने त्यांच्या आयुष्याची दोर मात्र टांगणीला लागली आहे.
रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपये
ऐच्छिक रक्तदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उर्जा मिळावी म्हणून रिफ्रेशमेंटसाठी केवळ १० रूपये दिले जातात. गत २० वर्षांपासून हा दर कायम आहे.

त्यामुळे रक्तदानास येणाऱ्या दात्यांना त्याच्या मोबदल्यात पौष्टीक घटकच मिळत नाही.
अशी आहे रक्त पेढीची स्थिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी मिळणारे रक्त अपुरे पडत आहे.
सन २०११ मध्ये चार हजार ६५० गरजवंतांना रक्त पुरविण्यात आले. त्या मोबदल्यात तीन हजार १६ व्यक्तींनी रक्तदान केले. त्यासाठी ९६ कॅम्प घेण्यात आले.
सन २०१२ मध्ये चार हजार ९७२ इच्छुकांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्या बदल्यात तीन हजार ४३८ व्यक्तींनी रक्तदान केले. यावर्षी ८७ कॅम्प घेण्यात आले.
सन २०१३ मध्ये सात हजार २८३ गरजवंतांना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. त्याबदल्यात तीन हजार ३४२ व्यक्तीेंनी रक्तदान केले. यावेळी ११२ कॅम्प घेण्यात आले.
सहा महिन्यात चार हजार ४३२ व्यक्तींना रक्ताचा पुरवठा करण्यात आला. ३३ कॅम्प घेण्यात आले. सध्याच्या स्थितीत रक्तपेढीत फार मोठा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला

आहे.

Web Title: 'Their' life is in the blood drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.