महामार्गावर दिशादर्शक फलकच नाहीत

By admin | Published: January 28, 2017 02:28 AM2017-01-28T02:28:26+5:302017-01-28T02:28:26+5:30

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

There are no trail panels on the highway | महामार्गावर दिशादर्शक फलकच नाहीत

महामार्गावर दिशादर्शक फलकच नाहीत

Next

वाहनधारक संभ्रमात : अपघाताची शक्यता बळावली, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पांढरकवडा : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील वर्दळीच्या व वळणाच्या अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. त्यामुुुुळे रात्री अपरात्री या मार्गावरुन धावणाऱ्या वाहनांच्या नवख्या वाहनचालकांची फसगत होते. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
तालुक्यातून नागपूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात जातो. याशिवाय तालुक्यात अनेक राज्य व जिल्हा मार्ग आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करतांना अनेक ठिकाणी मार्गदर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. गतीरोधक, वळण रस्ता, पूल, शाळा आदी बाबी समोर असल्याची सुचना विशीष्ट खूनांनी दर्शवून फलकांव्दारे वाहन चालकांना दिली जाते. या खूनांच्या इशाऱ्यावरुन चालकाला वाहन चालवितांना समोर काय आहे, ते माहित पडते. परिणामी वाहन चालक वाहनांवर नियंत्रण ठेवून वाहन पुढे हाकतो. मात्र तालुक्यात अनेक रस्त्यावर अशी फलकेच दिशेनाशी झाली आहे. फलकेदिसलीच तर त्या फलकावर आता बियाणे कंपनन्यांची जाहिरात पत्रके चिकटवलेली दिसतात. त्यामुळे नेमके समोर काय आहे , याचा वाहन चालकांना थांगपत्ताच लागत नाही. येथून नागपूर, यवतमाळ, चंद्रपुर, पारवा, हैद्राबाद मार्गावर रोज शेकडो वाहने धावतात. पांढरकवडा ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलके कित्येक दिवसांपासून वादळामुळे उन्मळून पडली आहेत. ती अद्याप तशीच पडून आहेत.
काही ठिकाणी बियाणे कंपन्यांनी आपली पत्रके लावली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वळण किंवा रस्त्यावर कोणत्या पध्दतीने वाहन चालवावे किंवा कुणीकडे वळावे याबाबतचे वाहनचालकांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात घडत आहे. (तालुका प्रतिनिधी)

बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
राष्ट्रीय महामार्गावरील चारपदरी मार्गाने रात्रंदिवस वाहतुक सुरु आहे. रोज या रस्त्यावरुन शेकडो वाहने भरधाव धावतात. त्यांना पुढील रस्ता किंवा वळण अथवा शाळा असल्याचे फलकावरुन कळते. मात्र आता ही फलकेच गायब झाली आहे. काही फलकांवर , तर आता विविध कंपन्यांची जाहिरात पत्रके लावण्यात आली आहेत. त्यामुळे समोर नेमके काय याची माहिती चालकांना मिळणे कठीण होते. बांधकाम विभागाने ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तिथे फलक लावणे आवश्यक आहे.तसेच या फलकावर जाहिरातीची पत्रके लावणाऱ्या बियाणे कंपन्यावर कारवाई करणे सुध्दा आवश्यक आहे.

Web Title: There are no trail panels on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.