जवळा ते चांदणी रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:57+5:302021-06-20T04:27:57+5:30

गणना, काकळदळा, चंदापूर, चांदणी, पारधी तांडा, ब्राह्मणवाडा तांडा, शेकलगाव, म्हसोला, पांगरी, पहूर या गावांतील वाहनधारक याच रस्त्याने प्रवास करतात. ...

There are potholes on the road near Chandni | जवळा ते चांदणी रस्त्यावर खड्डेच खड्डे

जवळा ते चांदणी रस्त्यावर खड्डेच खड्डे

Next

गणना, काकळदळा, चंदापूर, चांदणी, पारधी तांडा, ब्राह्मणवाडा तांडा, शेकलगाव, म्हसोला, पांगरी, पहूर या गावांतील वाहनधारक याच रस्त्याने प्रवास करतात. त्यांना नाहक त्रास होत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, आजपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी संपूर्ण गावातील लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आता पावसाळ्यात तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्याचे संपूर्ण काम करून लोकांना नाहक होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता मनोहर शहारे यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते, असे सांगितले. मात्र, सध्या गुळगुळीत रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची वाहतूक असते. पावसाळ्यात रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोट

सध्या कोणताही निधी उपलब्ध नाही. आम्ही या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. निधी उपलब्ध झाल्यास काम तातडीने करण्यात येईल.

मनोहर शहारे

कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

Web Title: There are potholes on the road near Chandni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.