नगर पालिकेत मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:42 PM2018-05-12T23:42:15+5:302018-05-12T23:42:25+5:30

कोणीही मंत्री, आमदार येतो आणि नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतो. कोणता रस्ता करायचा आणि कोणता रस्ता करायचा नाही, कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे अन् कोणत्या ठेकेदाराला द्यायचे नाही, हेही तेच ठरवतात. मंत्र्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे नगरपालिकेचे कामकाज रेंगाळते.

There is no interference in the Council of Ministers, MLAs | नगर पालिकेत मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप नकोच

नगर पालिकेत मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप नकोच

googlenewsNext
ठळक मुद्देकांचन चौधरी : आंतरराष्ट्रीय परिषदेत उठविला आवाज, विदर्भातील एकमेव नगराध्यक्ष उपस्थित

अविनाश साबापुरे / रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोणीही मंत्री, आमदार येतो आणि नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतो. कोणता रस्ता करायचा आणि कोणता रस्ता करायचा नाही, कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे अन् कोणत्या ठेकेदाराला द्यायचे नाही, हेही तेच ठरवतात. मंत्र्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे नगरपालिकेचे कामकाज रेंगाळते. खर्चही सार्थकी लागत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे, असा आवाज यवतमाळच्या नगराध्यक्षांनी थेट आंतरराष्ट्रीय परिषदेत उठविला. या परिषदेच्या निमित्ताने नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी यवतमाळ शहरातील समस्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडली. त्याबाबत त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.
दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये नुकतीच चौथी दक्षिण आशियाई महिला नेतृत्व विकास परिषद पार पडली. यात भारतातील विविध राज्यातील महिला महापौरांसह प्रामुख्याने श्रीलंका, जापान, भूतान, नेपाळ, बांग्लादेश, सिंगापूर, इंडोनेशिया, न्यूझीलंड, युगांडा, जकार्ता आदी देशांमधील महिला पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तर महिला नगराध्यक्ष म्हणून एकमेव यवतमाळच्या कांचन चौधरी यांना पाचारण करण्यात आले होते. तसेच नागपूरच्या महापौर नंदा जिचकारही सहभागी होत्या.
समानतेचे संस्कार घरातूनच झाले पाहिजे
नगराध्यक्ष कांचन चौधरी म्हणाल्या, जेंडर इक्वॅलिटी इन लीडरशिप या विषयावर परिषदेचा मुख्य फोकस होता. महिला नेतृत्व पुढे यायचे असेल, तर घरातूनच समानतेचे संस्कार व्हायला हवे. मी माझे अनुभव परिषदेत मांडले. बाळासाहेब जेव्हा पदावर होते, तेव्हाही त्यांनी मला मदत केली. आता मी पदावर आहे, तरी ते मला मदत करतात. ते स्वयंपाक बनवतात. सकाळचा नाश्ता बनवतात. हेच संस्कार आमच्या मुलावर झाले. मी घरकाम कशाला करू? ही विचारसरणीच आमच्याकडे नाही. त्यामुळे मला नगरपालिकेसाठी पूर्णवेळ देता येते. नगराध्यक्ष झाल्यावर बाळासाहेबांनी मला पहिली पत्रकार परिषद एकटीनेच ‘फेस’ करायला लावली. आता मी पूर्णत: ‘ट्रेन’ झाले. महिलांना संधी मिळाली तर ती कुठेच कमी पडत नाही, हे मी माझ्या उदाहरणातून सांगितल्यावर परिषदेत टाळ्या पडल्या.

Web Title: There is no interference in the Council of Ministers, MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.