साहेब, भाजी विकून भजे खाण्यासाठीही पैसे उरत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:22 PM2018-03-27T23:22:14+5:302018-03-27T23:22:14+5:30

‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात.

There is no money left to sell sahib and vegetables | साहेब, भाजी विकून भजे खाण्यासाठीही पैसे उरत नाही

साहेब, भाजी विकून भजे खाण्यासाठीही पैसे उरत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देभाजी उत्पादकांचे वास्तव : फुलकोबी, टमाटर, पालक बाजारात कवडीमोल

ज्ञानेश्वर मुंदे।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : ‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. साहेब, भाजी विकून शहरात भजे खायलाही पैसे उतर नाही’ असे उद्विग्न होऊन महागाव तालुक्यातील माळकिन्हीचे नारायण खंदारे सांगत होते. ही एकट्या माळकिन्हीच्या शेतकऱ्याची व्यथा नाही, तर सध्या भाजीपाल्याच्या पडलेल्या भावाने शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
गत तीन-चार महिन्यांपासून दारावर येणारा भाजी विक्रेता दहा रुपयाला दीड किलो टोमॅटो देत आहे. फुलकोबी आणि पालकाचीही असेच दर आहे. सर्व स्वस्ताई जणू भाजीपाल्यावरच आल्याचे दिसत आहे. दारावरचा भाजी विक्रेता दहा रुपयात दीड किलो टोमॅटो विकत असेल तर ज्याच्या शेतात पिकले त्या शेतकऱ्याला काय मिळत असेल हा मन सुन्न करणारा प्रश्न आहे. भाजी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा उतरलेल्या दरांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वास्तव पुढे आले.
माळकिन्ही येथीलच अनिल दुपारते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तर मार्केटमध्ये पायही ठेवला नाही. शेतात जाण्याची इच्छाही होत नाही. विठ्ठल दैत यांनी भाजीपाला विकूनही काही हातात उरत नाही. घर खर्च कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा सवाल त्यांनी केला. बिजोराचे ज्ञानेश्वर कड यांनी अर्ध्या एकरात मलचिंग पेपर टाकून टोमॅटोची लागवड केली. गत आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला.
नारायण खंदारे सांगत होते, यवतमाळपर्यंत नेण्यासाठी टोमॅटोच्या कॅरेटमागे ३५ रुपये खर्च येतो. तेथे गेल्यावर ५० रुपये कॅरेट प्रमाणे हाती येतात. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे अनेक शेतकरी सांगत होते. एप्रिल महिन्यापासून भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
भाजीपाला उत्पादनात एकरी २० हजार तोटा
महागाव तालुक्यातील माळकिन्ही हे जिल्ह्यातील सर्वाधिक भाजीपाला पिकविणारे गाव. येथील प्रकाश खंदारे सांगत होते, फुलकोबी शेतातच सडत आहे. टोमॅटो काढायला मजुरी परवडत नाही. मशागतीपासून तर विक्रीपर्यंतचा हिशेब लावला तेव्हा प्रती एकर २० हजार रुपयाने आम्ही तोट्यात आलो. टोमॅटोच्या एक एकर शेतीच्या मशागतीसाठी पाच हजार रुपये, बियाण्यांसाठी पाच ते सात हजार रुपये, टोमॅटोची झाडे सुतळीने बांधण्यासाठी चार हजार रुपये खर्च, फवारणीसाठी तीन हजार रुपये आणि माल तोडण्यासाठी एकरी पाच हजार रुपये खर्च येतो. एवढे करूनही बाजारात टोमॅटोचे कॅरेट ३० ते ३५ रुपयाला जात असेल तर जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला.

Web Title: There is no money left to sell sahib and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.