१५ दिवसांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:20+5:30
११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यानंतर १५ दिवसाचा कालावधी लोटला नव्याने एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. असे असले तरी धोका मात्र टळलेला नाही. खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत. यासाठी ५३ विविध उपाययोजनांचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. यातून १५८ लोक होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यावर १४ दिवस पाळत ठेवण्यात आली. कुठलीही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसली नाही. यामुळे ५३ व्यक्तींना क्वारंटाईन परिघाबाहेर काढण्यात आले. याशिवाय ज्या व्यक्तींचा निगेटीव्ह अहवाल आला होता, अशा व्यक्तींना आयसोलेशन वार्डातून बाहेर काढण्यात आले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. जिल्ह्यातील या सर्व व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. यामुळे क्वारंटाईन रुग्णांची संख्या १५८ वरुन १०१ वर आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ही जमेची बाजू आहे. पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात नव्याने दिसले नाही.
आता जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या यंत्रणेने पुणे आणि मुंबई येथून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात परतणाऱ्या व्यक्तींचा आकडा दहा हजारांवर असण्याचा अंदाज आहे. यातील तीन हजार व्यक्ती आरोग्य विभागापुढे आले आहे. त्यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोना विषाणूची बाधा रोखण्यासाठी शर्तीचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात प्रशासनाला सध्या यशही आले आहे. मात्र धोका अजून टळलेला नाही.
जिल्हा पहिल्याच स्टेजमध्ये असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिला होता. ही स्थिती अशीच कायम राखण्यासाठी यवतमाळकरांकडून नियमांचे पालन होण्याची अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
मदतीसाठी पालकमंत्र्यांची हेल्पलाईन
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे गावाकडे निघालेले अनेक कामगार, प्रवासी अडकून पडले आहे. जिल्ह््याबाहेर अडकलेल्या अशा प्रवाशांना आता परत आणणे शक्य नाही ते आहे तिथेच मदत मिळावी या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी समन्वयाकरिता हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यात रोजमजुरीकरिता गेलेले कामगार, शिक्षणाकरिता गेलेले विद्यार्थी, नोकरदार अडकून पडलेले आहेत.