१८ वर्षांपासून पुनर्वसन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:31 PM2019-02-26T21:31:33+5:302019-02-26T21:31:50+5:30
महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील अमडापूर प्रकल्पा अंतर्गत कुरळी गाव येते. या गावाचे गत १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. यामुळे गावकरी चिंतेत सापडले आहेत. हा प्रश्न निकाली निघावा म्हणून अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी यवतमाळात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐच्छिक पुनर्वसनाची मागणी केली आहे.
स्थानिक तिरंगा चौकामध्ये अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. या प्रकल्पामध्ये ७७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणच्या ग्रामस्थांचे १८ वर्षांपासून पुनर्वसनच झाले नाही. २१ नागरी सुविधांच्या खर्चासह प्रस्ताव तयार करण्यात यावा. ३४० घरांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यात यावे. पुनर्वसित संपादित जमिनीचा दर पाचपट लावण्यात यावा. शेतीला रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. या आंदोलनात १५० आंदोलक सहभागी झाले आहेत.
यामध्ये भोजूसिंग चव्हाण, रामेश्वर पाटील, गौतम पाटील, लक्ष्मण कटेवाड, आत्माराम जाधव, विश्वनाथ बेले, शिवाजी भुसाळे, मधुकर बोईनवाड, शोभा गजेलवाड, निर्जला इंगोले, पंचफुला आटागडे आदींचा समावेश आहे.