लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज; शिबिराला प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 02:23 PM2021-06-02T14:23:42+5:302021-06-02T14:24:10+5:30
Yawatmal News आजही अनेक ठिकाणी लसीकरणावरून नागरिकांत अज्ञान, समज गैरसमज मोठ्या प्रमाणात असल्याचेच त्यांच्या वर्तनावरून समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज, १० जण जुळणेही कठीण : गावातील लसीकरण शिबिरालाही प्रतिसाद नाही
यवतमाळ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. परंतु लसीकरणाचे वेगळे चित्र तालुक्यात व समाजात पाहायला मिळत आहे. आजही अनेक ठिकाणी लसीकरणावरून नागरिकांत अज्ञान, समज गैरसमज मोठ्या प्रमाणात असल्याचेच त्यांच्या वर्तनावरून समोर येत आहे.
एकीकडे मोठ्या शहरात लसीकरणासाठी रांगा लागत आहेत, तर तालुक्यात लसीकरण सुरू करायला १० व्यक्ती जुळण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, असे चित्र तालुक्यात आहे. तालुका आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने गावागावात शिबिर लावून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतु अनेक गावात नागरिक अजूनही लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी एका कोलाम वस्तीत लसीकरणासाठी शिबिर लावले होते. परंतु त्या गावातील नागरिकांनी लसीकरण करण्याला विरोध करीत आरोग्य चमुला निघून जाण्यास सांगितल्याची घटना घडली आहे. त्याठिकाणी सरपंच, पोलीसपाटील यांचे कोणीही ऐकत नव्हते. हीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे हतबल झालेल्या आरोग्य विभागाने हतबलता व्यक्त करीत समाजातील काही घटकांनी व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी पुढे येऊन लसीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. परंतु लसीकरणाचे वेगळे चित्र तालुक्यात व समाजात पाहायला मिळत आहे. आजही अनेक ठिकाणी लसीकरणावरून नागरिकांत अज्ञान, समज गैरसमज मोठ्या प्रमाणात असल्याचेच त्यांच्या वर्तनावरून समोर येत आहे.
एकीकडे मोठ्या शहरात लसीकरणासाठी रांगा लागत आहेत, तर तालुक्यात लसीकरण सुरू करायला १० व्यक्ती जुळण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, असे चित्र तालुक्यात आहे. तालुका आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रावर नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने गावागावात शिबिर लावून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. परंतु अनेक गावात नागरिक अजूनही लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी एका कोलाम वस्तीत लसीकरणासाठी शिबिर लावले होते. परंतु त्या गावातील नागरिकांनी लसीकरण करण्याला विरोध करीत आरोग्य चमुला निघून जाण्यास सांगितल्याची घटना घडली आहे. त्याठिकाणी सरपंच, पोलीसपाटील यांचे कोणीही ऐकत नव्हते.
हीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे हतबल झालेल्या आरोग्य विभागाने हतबलता व्यक्त करीत समाजातील काही घटकांनी व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी पुढे येऊन लसीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.