आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:02 PM2018-10-22T22:02:24+5:302018-10-22T22:02:43+5:30

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

There were no books in tribal schools | आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

Next
ठळक मुद्देप्रकल्पाची दिरंगाई : विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
प्रक ल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही आता संताप नोंदवित आहे. शाळा सुरू होऊन चार महिने झाले. त्यापूर्वीच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंदणी केली. मात्र आॅक्टोबर महिना आला तरी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील आश्रमशाळेत पोहचले नाही.
जिल्ह्यातील १३ आश्रमशाळेत नववीमध्ये ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर अकरावीमध्ये ३०० विद्यार्थी आहे. आश्रमशाळेकडून प्रकल्प कार्यालयाला वारंवार विचारणा होत आहे. मात्र प्रकल्प कार्यालयाने आजपर्यंत पुस्तके दिली नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये आहे. मात्र प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आलेली असताना विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकेच नाही. त्यामुळे ते अनुत्तीर्ण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
दहावी, बारावीची पुस्तके १४ आॅगस्टला
बोर्डाची परीक्षा म्हणून विद्यार्थी उन्हाळ्यात अभ्यासाला प्रारंभ करतात. मात्र आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची पुस्तके १४ आॅगस्टला मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

Web Title: There were no books in tribal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.