पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:26 PM2018-04-29T22:26:17+5:302018-04-29T22:26:17+5:30

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.

They 'moved' forward for water | पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

पाण्याकरिता ‘ते’ पुढे सरसावले

Next
ठळक मुद्देआईच्या तेरवीचा खर्च टाळून सुरू केला टँकर‘आयएमए’ सरकारी दवाखान्यात पुरविते पाणीशिकवणी वर्ग शिक्षकाने सुरू केली जलसेवा

रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते. तर दुसरीकडे व्याकूळ नागरिकांची तहान भागविण्याकरिता काही संघटना, शिकवणी वर्गाचे शिक्षक आणि काही व्यक्तींनी पाण्याचे टँकर सुरू केले आहे.
यवतमाळ शहरातील पाणीटंचाई निवारण्यासाठी नगरपरिषद, शिवसेना आणि विविध पक्षांचे टँकर सुरू आहेत. हे टँकर अपुरे पडत आहेत. यामुळे काही व्यक्ती पुढे आल्या आहेत. सामाजिक दायित्व म्हणून त्या काम करीत आहेत.
पेशवे प्लॉटमध्ये असणारे बाळासाहेब नखाते यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या तेरवीचा खर्च वाचवून पाणी वाटण्याचा निर्णय घेतला. यातून पुष्पाताईच्या स्मरणार्थ पाणी टँकर वितरित केले जात आहे. जय गुरूदेव सेवा संघाचे लोक या पाणी वितरणात मोलाची भूमिका पार पाडत आहेत. यातून मानसिक समाधान मिळाल्याचे नखाते म्हणतात.
शिंदे प्लॉटमध्ये वास्तव्याला असणारे अरसोड कोचिंग क्लासचे संचालक योगेश अरसोड यांनी सामाजिक ऋण फेडण्यासाठी पाण्याचे टँकर वितरित करण्याचा निर्णय घेतला. ही जलसेवा त्यांनी सुरू केली आहे. शहरातील टंचाई भागात ते मोफत पाणी वितरित करीत आहेत. अजय किन्हीकर त्यांना या कामात मोलाची मदत करीत आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आयएमएचे पाणी
वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यातून भरती विभाग आणि आॅपरेशन थिएटर बंद करण्याची स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पाण्याची टंचाई पाहता आयएमएने पाणी वितरणाचा निर्णय घेतला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्निल मानकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांशी संपर्क केला. त्यांनी पाण्याची अडचण जाणून घेतली. वैद्यकीय महाविद्यालयात दरदिवसाला किमान एक लाख लिटर पाण्याची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालाजवळ २५ हजार लिटर पाण्याची क्षमता आहे. आता आयएमएने २४ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे पाणी पुरवठ्याचा निम्मा प्रश्न निकाली निघण्यास मदत झाली. यासाठी डॉक्टरांनी स्वनिधी गोळा केला आहे.
मथुरानगरात पक्ष्यांकरिता पाणवठा
माणसांना पाण्यासाठी मारामार सहन करावी लागत आहे. अशा स्थितीत पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची काळजी बोटावर मोजता यईल अशाच लोकांना आहे. यवतमाळ शहरातील शिक्षक नरेश उन्हाळे यांनी यातून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

Web Title: They 'moved' forward for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.