येऊन बसले अन् खदाखदा हसले
By admin | Published: May 24, 2017 12:36 AM2017-05-24T00:36:59+5:302017-05-24T00:36:59+5:30
ज्येष्ठ नागरिक भवनात उपस्थित सारेच खदाखदा हसत होते. कुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहात होत्या.
हास्य विनोदी कार्यक्रम : अंकुर साहित्य संघाचे आयोजन, मान्यवरांचा संघातर्फे सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्येष्ठ नागरिक भवनात उपस्थित सारेच खदाखदा हसत होते. कुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहात होत्या. हास्याची उडणारी कारंजी प्रत्येकाला एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवत होती. निमित्त होते अंकुर साहित्य संघ शाखा यवतमाळतर्फे हास्याच्या बहारदार कार्यक्रमाचे. दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमातून सदा हसविणारे अरविंद भोंडे व इतरांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने रसिकांना एका वेगळ्या कार्यक्रमाची मेजवाणी मिळाली.
बुलडाणा अर्बन बँकेचे सरव्यवस्थापक भगवान बरडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, डॉ. अशोक नारखेडे, अजाबराव वातीले, डॉ. मनिष सदावर्ते, सुरेश गांजरे, अंकुर शाखेच्या अध्यक्ष विद्या खडसे आदी उपस्थित होते. राहुल सातव यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल अशोक नारखेडे, डॉ. सिद्धार्थ भगत, डॉ. अविनाश शिर्के यांचा सपत्नीक, तर कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल पुष्पाताई नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अरविंद भोंडे यांच्यासह तुळशीराम बोबडे, शिवलिग काटेकर, वैभव शिवरकर यांनी उपस्थितांना खदाखदा हसविले. या हास्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हिम्मत ढाले होते.
यावेळी डॉ. रमाकांत कोलते, प्रा. काशीनाथ लाहोरे, प्रा. न.मा. जोशी, प्रा. रवींद्र ढगे, प्रा. दिनुभाऊ वानखेडे, प्रा. अनंत अट्रावलकर, डॉ. मेनकुदळे, वैशाली सवई, जयंत चावरे, अॅड. राजेश साबळे, दत्ता चांदोरे, डॉ. साहेबराव साखरे, डॉ. जयकुमार गोल्हर, प्रकाश पाम्पट्टीवार, चंद्रकांत कारिया, लिलाधर वाघमारे, मनोहर शहारे, बाळासाहेब पिसाळकर, अशोक आष्टीकर, राजन टोंगो, पुष्कर सराड, घनश्याम दरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प अधिकारी कृष्णराव वातीले, परमेश्वर म्हात्रे, विभा दरबेशवार हे होते. संचालन प्रमोद देशपांडे, तोष्णा मोकडे यांनी, तर आभार सीमा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील खडसे, महेश अलगुडवार, व्यंगचित्रकार सुरेश राऊत, ताराचंद कंठाळे, महेश माकडे, प्रमिला उमरेडकर, स्मिता भोईटे, तात्या राखुंडे आदींनी परिश्रम घेतले.