थिमेटने १० जनावरे ठार

By admin | Published: January 14, 2015 11:16 PM2015-01-14T23:16:30+5:302015-01-14T23:16:30+5:30

शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली.

Thimat killed 10 cattle | थिमेटने १० जनावरे ठार

थिमेटने १० जनावरे ठार

Next

बोरीअरब : शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क वन्यप्राण्यांसाठी थिमेट नामक विषारी द्रव गवतावर टाकले. हे गवत खाल्याने एक-दोन नव्हेतर तब्बल दहा जनावरे मृत्युमुखी पडली. तर पाच जनावरांची प्रकृती गंभीर आहे. ही खळबळजनक घटना लगतच्या पेंढारा शिवारात घडली.
नेर तालुक्यातील पेंढारा येथील गुराखी ज्ञानेश्वर रणमले यांनी गावातील २५ ते ३० जनावरे चारण्यासाठी जंगलात नेली. जंगलानजीक शेत असल्याने तेथे वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी गवतावर थिमेट नामक विषारी द्रव टाकून ठेवले होते. गुराखी रणमले यांनी चारण्यासाठी नेलेल्या जनावरांनी थिमेट टाकून असलेले गवत खालले. अल्पावधीतच जनावरांना विषबाधा झाली. त्यामध्ये नऊ गाई आणि एक गोऱ्हा जागीच ठार झाले. तर पाच जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहे.
एका गर्भवती गायीची अवस्था पाहून तर कुणाचेही हृदय गहिवरावे. थिमेट खाल्याने तिचे पोटच फाटले. त्यातून चिमुकले पिलूही बाहेर पडले. मातेशेजारी त्या मृत पिलाला पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
ही जनावरे पेंढारा येथील शंकर खद्रे, पुलाबाई देवकर, महादेव रणमले, गोविंद लडके, विठ्ठल बेले, परसराम बेले, किसन ढोक आदींच्या मालकीची होती. त्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. घटनेनंतर पशुपालक पोलिसात तक्रार देण्यास गेले. मात्र परस्पर प्रकरण मिटवा, असा सल्ला देत पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पशुपालकांची आहे. मात्र पोलीसच पाठीराखे झाल्याने तो शेतकरी निश्चिंत असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Thimat killed 10 cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.