बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

By admin | Published: April 9, 2016 02:39 AM2016-04-09T02:39:52+5:302016-04-09T02:39:52+5:30

स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची बांधिलकी जोपासणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यांचे कार्य अजरामर आहे.

Think of Babasaheb Ambedkar's views | बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणा

Next

मनोहरराव नाईक : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्व
पुसद : स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांची बांधिलकी जोपासणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यांचे कार्य अजरामर आहे. बाबासाहेबांचे सामाजिक तत्त्वज्ञान फार मोठे आहे, ते आम्ही आज आचरणात आणतो काय, हा मोठा प्रश्न आहे. यावर चर्चेची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे केले.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित सम्यक जाणीवेच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, डॉ. वामन गवई, के.डी. जाधव, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. मो.नदीम, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, फकीरराव वाढवे, अर्जुनराव लोखंडे, गोविंद भवरे, भीमराव कांबळे, शेख कय्युम उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, कुणी मतांसाठी बाबासाहेबांचे नाव घेत असतील मात्र आपण बाबासाहेबांच्या सम्यक विचारांचे आचरण करतो. त्यांच्या प्रज्ञाशील या गुणांची समाजाला खरी गरज आहे, असे सांगितले. प्रास्ताविक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश वाढवे यांनी केले. सुरुवातीला संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्रा.विलास भवरे यांनी केले. सुजाता महिला मंडळाने बुद्धवंदना सादर केली. तर सुमन चोपडे यांनी भीमगीत गायन केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.महेश हंबर्डे यांनी तर आभार पी.एम. कांबळे यांनी मानले. (प्रतिनिधी)

कोळसे पाटील यांचे बीज भाषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत हक्कासह संविधान दिले. या संविधानाची चौकट पोलादी आहे, मात्र विषारी विचारांमुळे संविधानाची अंमलबजावणी शून्य झाली आहे. वैयक्तिक स्वार्थातून बाहेर पडा, स्वतंत्र विचार करायला शिका आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी पेटून उठा असे विचार न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी आपल्या बीज भाषणातून व्यक्त केले. आंबेडकरी विचारातून भारतीय संविधानाची यशस्वीता याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Think of Babasaheb Ambedkar's views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.