‘त्या’ निवासी डॉक्टरची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:55 PM2018-12-28T22:55:15+5:302018-12-28T22:56:45+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असभ्य वागणूक देणाऱ्या ‘त्या’ निवासी डॉक्टरची आता चौकशी केली जाणार आहे.

'Those' resident doctors will be investigating | ‘त्या’ निवासी डॉक्टरची होणार चौकशी

‘त्या’ निवासी डॉक्टरची होणार चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देअसभ्य वर्तणूक : रॅगिंगनंतर ओपीडीतही हंगामा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असभ्य वागणूक देणाऱ्या ‘त्या’ निवासी डॉक्टरची आता चौकशी केली जाणार आहे.
सदर डॉक्टरच्या वागणुकीमुळे अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला. गरीब रुग्णांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. एका पोलीस अधिकाºयासोबतही अतिशय अर्वाच्य भाषेत वाद घातला गेला. त्याचा व्हीडीओही व्हायरल होत आहे. त्यानंतरही ‘त्या’ डॉक्टरला संबंधित विभाग प्रमुख पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.
रुग्णालयातील वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार घडला होता. यामध्येही हा डॉक्टर असल्याचे चौकशीतून पुढे आले. मात्र हा डॉक्टर एका संघटनेचा सचिव असल्याने त्याच्याविरूद्ध इतर विद्यार्थ्यांनी तक्रार देण्याची हिंमत केली नाही. तेव्हापासून या डॉक्टरची मनमानी वाढल्याचे बोलले जाते. २० डिसेंबरला चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात आणले होते. त्यावेळी जखमीचे बयाण नोंदविण्यासाठी गेलेल्या अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस अधिकाºयासोबतही डॉक्टरने वाद घातला. एवढेच नव्हे, तर अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली.
अशीच वागणूक शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रतिसाद फाऊंडेशनच्या सदस्यांना देण्यात आली. त्यांनी एका निराधार जखमी महिलेला रुग्णालयात आणले होते. तेव्हा असाच प्रकार घडला. प्रतिसाद फाऊंडेशनच्या सदस्यांनी डॉ. भगवान कांबळे यांची नावानिशी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली. असभ्य वागणूक व अरेरावी करीत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी प्रतिसाद फाऊंडेशनने केली.
डॉक्टरविरूद्ध सातत्याने तक्रारी येत असल्याने अखेर अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी चौकशी समिती गठित केली. या समितीत ‘ईएनटी’चे विभाग प्रमुख डॉ.सुरेंद्र गवार्ले, बधीरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दामोधर पटर्वधन, डॉ. पाशू शेख, डॉ. स्नेहलता हिंगवे, डॉ. शरद मानकर यांचा समावेश आहे.
 

Web Title: 'Those' resident doctors will be investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.