Maharashtra Election 2019; परप्रांतीय २० हजार पोलीस, होमगार्ड तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:39 PM2019-10-17T12:39:53+5:302019-10-17T12:40:17+5:30

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने परप्रांतातून २० हजार पोलीस व होमगार्ड बोलविण्यात आले आहेत.

Thousands of policemen, home guards deployed for election | Maharashtra Election 2019; परप्रांतीय २० हजार पोलीस, होमगार्ड तैनात

Maharashtra Election 2019; परप्रांतीय २० हजार पोलीस, होमगार्ड तैनात

Next
ठळक मुद्दे आठ कोटी ७७ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने परप्रांतातून २० हजार पोलीस व होमगार्ड बोलविण्यात आले आहे. राज्यातील विविध मतदारसंघात हे अतिरिक्त मनुष्यबळ स्थानिक पोलिसांच्या दिमतीला तैनात केले जाणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणा या चार राज्यातून पोलीस कुमक मागण्यात आली आहे. परप्रांतातून येणाऱ्या पोलीस व होमगार्ड जवानांचा हा आकडा सुमारे २० हजार एवढा आहे. राज्यभर त्यांची नेमणूक होणार आहे. त्यांच्या भोजन, निवास, प्रवास व अन्य भत्त्यांवर एकूण आठ कोटी ७७ लाख नऊ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. या खर्चाला १६ ऑक्टोबर रोजी राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली असून तसा आदेशही जारी केला आहे. त्या-त्या राज्यातील आकारणीनुसार या २० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना भत्ते दिले जाणार आहे.

Web Title: Thousands of policemen, home guards deployed for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.