दगडधानोरा येथे महिलांना धमकी

By admin | Published: May 28, 2016 02:24 AM2016-05-28T02:24:22+5:302016-05-28T02:24:22+5:30

तालुक्यातील दगडधानोरा येथे दारूबंदी करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करण्यात आली.

Threatens to the women at the massacre | दगडधानोरा येथे महिलांना धमकी

दगडधानोरा येथे महिलांना धमकी

Next

दारूबंदीसाठी पुढाकार : दारू विक्रेत्याकडून युवकास मारहाण
नेर : तालुक्यातील दगडधानोरा येथे दारूबंदी करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच या मोहिमेसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकास दारू विक्रेत्यासह ग्रामपंचायत सदस्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. दरम्यान, संतप्त महिलांनी नेर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
दगडधानोरा येथे दारूबंदीसाठी महिला आणि गावातील काही पुरुष मंडळींनी पुढाकार घेतला. यासाठी येथील ठाणेदार गणेश भावसार आदींनी सहकार्य केले. एवढेच नव्हे, तर ठाणेदारांनी दारूबंदीबाबत प्रबोधन केले. शुक्रवारपासून दारूबंदी झाली. दारू विक्रेते गोकुल हिरालाल जयस्वाल याला सकाळी ९ वाजता पकडण्यात आले. यामुळे संतप्त होऊन गोकुल जयस्वाल व विजय जयस्वाल यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. दारूबंदीसाठी सहकार्य करणारे दिनेश मधुकर महल्ले यांना ग्रामपंचायत सदस्य गजानन श्यामराव महल्ले, गोकुल जयस्वाल व विजय जयस्वाल यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडला. शिवाय गजानन महल्ले याने महिलांना शिवीगाळ केली.
महिलांनी थेट नेर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यावेळी सीमा शेळके, नीलिमा गुल्हाने, स्वाती महल्ले, रेखा महल्ले, सुनीता महल्ले, उमा महल्ले, जयश्री पाटणकर, मुक्ता नागरीकार, वंदना महल्ले, निर्मला कावडे, मीना वानखडे, बेबी महल्ले, आशा महल्ले आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Threatens to the women at the massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.