साडेतीन एकर केळी आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:04 PM2018-04-21T22:04:32+5:302018-04-21T22:04:32+5:30
तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्याच्या राजुरा शिवारातील श्रीराम ठाकरे यांच्या शेतातील साडेतीन एकर केळी जळून खाक झाली. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली. ड्रीप पाईपसह संपूर्ण केळी खाक झाल्याने शेतकऱ्याचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.
राजुरा शिवारातील ठाकरे यांच्या दूरच्या शेतात कुणीतरी धुरा पेटविला. वारा असल्याने ही आग धुºया-धुºयाने ठाकरे यांच्या शेतापर्यंत पोहोचली. काही वेळातच या आगीने ठाकरे यांचे शेत कवेत घेतले. दुपारी १ वाजता ठाकरे यांच्या शेतातील संपूर्ण केळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोबतच शेतातील इतर सहित्य जळाले. शेतात साडेतीन एकर केळीसाठी ड्रीप केले होते. सहा महिन्यांपूर्वी लावलेल्या केळीचे उत्पादन आॅगस्टमध्ये सुरू होणार होते. मात्र आगीने ड्रीपसह संपूर्ण केळी जळाली.
ड्रीपचा दीड लाख खर्च, केळीला लावलेला सहा महिन्यांपासूनचा दोन लाख रुपये खर्च, असे साडेतीन लाख आणि साडेतीन लाख रुपये नफा, असे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्रीराम ठाकरे यांनी सांगितले. तक्रारीवरून तलाठ्यांनी नुकसानीचा सर्वे केल्याची माहिती आहे.
ऐन खरीप हंगाम तोंडावर असताना ठाकरे यांचे नुकसान झाले. शेत जळाल्याने लगेच त्या ठिकाणी दुसरे उत्पन्न घेणेही कठीण आहे. त्यामुळे ठाकरे आर्थिक संकटात सापडले आहे. प्रखर उष्णता आणि वाºया तीव्र झोतामुळे ही आग चांगलीच भडकली होती.