कळंबमध्ये चोरीच्या प्रकरणात तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:22+5:302021-05-14T04:41:22+5:30
कळंब : शहरात फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी घरफोडी व मोबाईलचे दुकान लुटण्यात आले होते. याप्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ...
कळंब : शहरात फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी घरफोडी व मोबाईलचे दुकान लुटण्यात आले होते. याप्रकरणात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून गुरुवारी तीन आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
आरोपींमध्ये सतीश बाबाराव मडावी (२३), पवन महादेव डाखोरे (२६) व सूरज विठ्ठल कुळसंगे (२१) सर्व रा. दादा बादशहा नगर, राळेगाव यांचा समावेश आहे. शहरातील शहाब नगरातील विजय पूनमचंद छल्लाणी व पारवेकर नगरातील भूषण दिलीप गोरे यांचे घर व दुकान फोडून त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल लंपास केला होता. तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याजवळून ५ मोबाईल, एक एलईडी टीव्ही, एक कुलर, नगदी १६ हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी हिंगणा, जि. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीची ही कबुली दिली. ठाणेदार अजीत राठोड, पोलीस उपनिरीक्षक किशोर मावसकर, सरिता मरकाम, हवालदार गणेश अनकर, धर्मपाल घायवाटे, राजू कुडमेथे, ओम धारणे, स्वप्नील बेलखेडे, सचिन ठाकरे आदींनी ही कारवाई केली.