आधार कार्डवर तीन बॅग युरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:07+5:30

कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशीकरिता खताचे तीन डोज दिले जातात. शेतकऱ्यांनी दुसरा डोज दिला आहे. मात्र अनेकांना युरियाच मिळाला नाही.

Three bags of urea on Aadhar card | आधार कार्डवर तीन बॅग युरिया

आधार कार्डवर तीन बॅग युरिया

Next
ठळक मुद्देआठ हजार मेट्रिक टनाची टंचाई : चंद्रपूर, नांदेड, पिंपळखुटीवरुन पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : युरिया टंचाइने जिल्ह्यात एका आधार कार्डवर केवळ तीन बॅग युरिया शेतकऱ्यांना दिला जात आहे. टंचाईमुळे फुलसावंगी, बोरीअरब येथे शेतकऱ्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. सोमवारी फुलसावंगी येथे पोलिसांना पाचारण केले गेले. पोलीस व कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युरियाचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्याकरिता ३२ हजार मेट्रिक टन युरियाची मागणी नोंदविली होती. आतापर्यंत २४ हजार मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात पोहोचला. विशेषत: कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर जिल्ह्यात सहा हजार मेट्रिक टन युरिया पोहोचला. यानंतरही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टनाची प्रतीक्षा आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी लॉकडाऊन केले जात आहे. अनेक तालुके लॉकडाऊन झाले. पुढे परिस्थिती बिकट झाल्यास आणखी लॉकडाऊन होईल. यामुळे तालुका मुख्यालयात प्रवेशच मिळणार नाही. यामुळे शेतकरी पिकांसाठी लागणारा युरिया आतापासूनच खरेदी करून ठेवत आहे. कपाशीकरिता खताचे तीन डोज दिले जातात. शेतकऱ्यांनी दुसरा डोज दिला आहे. मात्र अनेकांना युरियाच मिळाला नाही. यामुळे कपाशीची वाढ खुंटण्याचा अधिक धोका शेतकऱ्यांना वाटत आहे. यातून मिळेल त्या ठिकाणावरून युरिया खरेदी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. या संधीचा फायदा घेत काही विक्रेत्यांनी खताचे लिकिंग सुरू केले असून ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे.

पिकांची अवस्था बिकट, कपाशीची वाढ खुंटली
युरियाच्या तुटवड्याने जिल्ह्यातील पिकांची अवस्था बिकट झाली असून कपाशीची वाढ खुंटली आहे. भाजीपाला आणि इतर पिकांनाही युरियाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील युरियाचा तुटवडा कायम आहे. यामुळे ज्या ठिकाणी युरिया पोहोचतो त्या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या रांगा लागत आहेत.

जिल्ह्यात युरियाचा मुबलक पुरवठा होत आहे. चंद्रपूर, पिंपळखुटी आणि नांदेड रॅकपॉर्इंटवरून युरिया आला आहे. प्रत्येक तालुक्यात त्याचे वितरण करण्यात आले. शेतकºयांनी धीर धरावा. प्रत्येकाला युरिया मिळेल.
- राजेंद्र घोंगडे
प्रभारी एडीओ, यवतमाळ

Web Title: Three bags of urea on Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.