तीन बालकांचा बुडून मृत्यू
By admin | Published: May 31, 2014 11:45 PM2014-05-31T23:45:16+5:302014-05-31T23:45:16+5:30
गावालगतच्या तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
पांढुर्णाची घटना : पोहणे जीवावर बेतले
पुसद : गावालगतच्या तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
संदीप विष्णू राठोड (१४), तन्नू विष्णू राठोड (१३) आणि अजय सुधाकर राठोड (१४) असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या बालकांची नावे आहे. संदीप आणि विष्णू हे सख्खे भाऊ आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हे तिघे गावानजीकच्या तलावावर पोहण्यासाठी गेले. तिघापैकी संदीपला पोहणे येत नव्हते. मात्र या दोघांनी हिंमत देत त्याला पाण्यात उतरविले. पाण्यात उतरताच संदीप गटांगळ्या खावू लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा लहान भाऊ तन्नू राठोड आणि सोबत असलेला अजय राठोडही गेला. मात्र एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्न करीत होते. ही बाब तलावाच्या तीरावर असलेल्या एका मुलाला दिसली. त्याने गावात धावत जाऊन या घटनेची माहिती दिली. गावकर्यांनी तत्काळ तलावाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिघांचेही प्रेतच पाण्याबाहेर काढावे लागले. या घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पांढुर्णाकडे धाव घेतली. तीनही बालकांचे शवविच्छेदन पुसद येथे करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)