पुसदमध्ये बंदुक व जिवंत काडतुसासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By विशाल सोनटक्के | Published: January 30, 2023 01:53 PM2023-01-30T13:53:49+5:302023-01-30T13:58:18+5:30

मोक्का गुन्ह्यातील आरोपी : पिस्टल घेवून दुचाकीवर होता फिरत

three criminals arrested with gun and live cartridges in the bag | पुसदमध्ये बंदुक व जिवंत काडतुसासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

पुसदमध्ये बंदुक व जिवंत काडतुसासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

पुसद (यवतमाळ) : मोक्का गुन्ह्यातील आरोपी साथीदारासह पिस्टल घेवून दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टीव्ही केंद्राजवळ गाठून तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीची बिना मॅग्झीनची पिस्टल एका जिवंत काडतुसासह जप्त करण्यात आली. ही कारवाई पुसद येथे रविवारी रात्री करण्यात आली.

पुसद शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याविरोधात मोहीम राबवित आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास पथकास माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यात आरोपी असणारा शेख हाफीज शेख कादीर हा साथीदारासह पिस्टल घेवून दुचाकीवर फिरत आहे. तो अजय मुंगसाजी डायनिंग हॉल टीव्ही केंद्र येथे होता. त्याच्याकडून घातपाताची शक्यता असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ टीव्ही केंद्र परिसरात सापळा रचला. तेथे दुचाकीवर एकजण बसलेला व त्याच्या बाजूस दोघेजण उभे असल्याचे आढळले. पथकाने अचानक जवळ जावून तिघांना घेरले. विचारपूस केली असता त्यातील एकजण शेख हाफीज शेख कादर (३२) रा. मोमीनपुरा धनकेश्वरनगर हा असल्याचे उघड झाले. पथकाने अन्य दोघांना ताब्यात घेतले.

शेख मुस्तफा शेख फरीद (२१) रा. अखेरतनगर पुसद आणि मुकेश  मुकिंदा चौरे (२३) मोमीनपुरा धनकेश्वरनगर अशी या दोघांची नावे आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता शेख हाफीज शेख कादरकडे देशी बनावटीची विना मॅग्झीनची पिस्टल व बॅरलमध्ये एक जीवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तिघांकडील मोबाईलसह दुचाकी गाडी जप्त केली. सदर पिस्टल आरोपींनी शेख मुसवीर रा. डोंगरगाव ता. पुसद याच्याकडून ३० हजार रुपयांना विकत घेतल्याचे पुढे आले.

या तीनही आरोपींवर भारतीय शस्त्र कायदा कलम ३, २५, ३५, अन्वये पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर पाेलीस अधीक्षक पीयूष जगताप, प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनात पंकज पातुरकर, मोहंमद ताज, सुनील पांडागळे, दिगंबर गिते आदींनी केली.

Web Title: three criminals arrested with gun and live cartridges in the bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.