पाणलोट योजनेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

By admin | Published: March 23, 2017 12:27 AM2017-03-23T00:27:13+5:302017-03-23T00:27:13+5:30

गावागावात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन खेडी समृद्ध व्हावी या उदात्त हेतुने

Three crore corruption in the catchment scheme | पाणलोट योजनेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

पाणलोट योजनेत तीन कोटींचा भ्रष्टाचार

Next

माहितीच्या अधिकारातून घोटाळा उघड : दहा गावांमध्ये पाझर तलाव कागदावरच
पुसद : गावागावात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन खेडी समृद्ध व्हावी या उदात्त हेतुने केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात पाणलोट विकास योजना राबवित आहे. मात्र जनसामान्यांच्या हिताच्या या योजनेला काही संस्था हरताळ फासून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानताना दिसून येत आहे. असाच खळबळजनक प्रकार पुसद तालुक्यात माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आला.
येथील एका स्वयंसेवी संस्थेने दहा गावातील पाझर तलाव केवळ कागदावर दाखवून तब्बल दोन कोटी ८० लाख ३९ हजार १०० रुपये दडपल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुसद तालुक्यातील वडसद, मारवाडी बु., मारवाडी खु., नाणंद खु., इनापूर, आमदरी (ई), वसंतवाडी, सावरगाव गोडे, पिंपळगाव (ई), नानंद (ई) या दहा गावांमध्ये सदर संस्थेला शासनाकडून पाणलोट विकास योजनेअंतर्गत विकासात्मक कामे करावयाची होती.
२००३ ते २०१० या कालावधीत ही कामे करावयाची होती. मात्र संस्थेने प्रत्यक्षात पाणलोट विकासाची कामे न करता केवळ कागदावर पाझर तलाव दाखवून जवळपास तीन कोटी रुपयांची देयके हडपली. ही बाब येथील सेवानिवृत्त गृहपाल एस.के. राठोड यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. त्याच्या तक्रारीनुसार व तालुक्यातील एका स्वयंसेवी संस्थेने १० गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे न करताच कोट्यवधी रुपये हडप केल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये वडसद येथे २४ लाख ८० हजार ३०० मारवाडी बु. येथे २४ लाख ८४ हजार ८००, मारवाडी खु. येथे २५ लाख ३४ हजार ५००, नानंद खु. येथे २६ लाख २७ हजार २००, इनापूर येथे २२ लाख ६२ हजार ५००, आमदरी येथे २४ लाख ८३ हजार ८००, वसंतवाडी येथे २४ लाख नऊ हजार ४००, सावरगाव गोरे येथे २४ लाख २५ हजार ६००, पिंपळगाव ई २५ लाख ५६ हजार ९००, नानंद ई. येथे २१ लाख ९१ हजार ९०० असे एकूण दोन कोटी ८० लाख ९०० रुपयांची देयके उकळली.
विशेष म्हणजे सदर संस्थेने तयार केलेले पाणलोट प्रकल्प संबंधित गावच्या ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून याबाबतचा ग्रामसभेचा ठराव घेणे अनिवार्य होते. मात्र तसे कुठेही झाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त गृहपाल एस.के. राठोड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three crore corruption in the catchment scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.