तीन दिवसांत बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:27+5:302021-05-13T04:42:27+5:30
यवतमाळ : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. १० मे रोजी १०१०, ११ मे ...
यवतमाळ : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. १० मे रोजी १०१०, ११ मे रोजी ११२७, तर बुधवार, १२ मे रोजी १२३१, असे एकूण ३३६८ जण कोराेनामुक्त झाले. दुसरीकडे गत दिवसांत बाधितांची संख्या २३०१ आहे. दरम्यान, बुधवारी ७१० जण पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्याबाहेरील पाच मृत्यूसह एकूण २७ मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी ८०७९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७१० जण नव्याने पॉझिटिव्ह आले. ७३६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात ६१६४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यापैकी २५११ रुग्णालयात भरती, तर ३६५३ गृहविलगीकरणात आहे. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ हजार १३८ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५७ हजार ४०५ आहे. जिल्ह्यात एकूण १५६९ मृत्यूची नोंद आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १३.०२, तर मृत्युदर २.४१ आहे.
बुधवारी यवतमाळ येथील ८१, ६६, ७१, ५०, ५० वर्षीय महिला आणि ६०, ७७, ७० वर्षीय पुरुष, कळंब शहरातील ८० वर्षीय, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ५७ वर्षीय महिला, दिग्रस येथील ७८ वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, वणी तालुक्यातील ८५ वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील ५९ वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील ६०, ५४ वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील ५७ वर्षीय महिला, जिल्ह्याबाहेरील नांदेड येथील ७७ वर्षीय पुरुष व ८५ वर्षीय महिला, चंद्रपूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील ८० वर्षीय पुरुष, तर खासगी रुग्णालयांत वणी येथील ८१ वर्षीय पुरुष, मारेगाव येथील ६० वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील ५२ व ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या ७१० जणांमध्ये ४४७ पुरुष आणि २६३ महिला आहेत. यात वणी येथील ७७, यवतमाळ ८४, पांढरकवडा ९१, पुसद ५६, घाटंजी ६५, दिग्रस ३४, झरीजामणी २, बाभुळगाव ९, दारव्हा ८८, नेर ४८, आर्णी १७, राळेगाव ३८, मारेगाव २५, उमरखेड ३४, कळंब १७, महागाव १५ आणि इतर शहरातील १० रुग्ण आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत पाच लाख २७९ नमुने पाठविले. त्यापैकी चार लाख ९७ हजार ६७७ प्राप्त, तर दोन हजार ६०२ अप्राप्त आहे. चार लाख ३२ हजार ५३९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
बॉक्स
केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस
लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक केंद्रावर केवळ दुसऱ्या डोसचेच लसीकरण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात उपलब्ध कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्डचा दुसरा डोस नागरिकांना देण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पहिला डोस घेतलेल्या व दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांची केंद्रनिहाय संख्या तयार करून तेथे दुसऱ्या डोससाठी लस प्राप्त होईल. त्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेशापर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण थांबविण्यात येईल. उपलब्ध लसीचा उपयोग हा दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.