कोसदणी घाटातील अपघातात तीन जखमी

By admin | Published: January 16, 2016 03:07 AM2016-01-16T03:07:23+5:302016-01-16T03:07:23+5:30

येथील कोसदणी घाटात शुक्रवारी सकाळी काही वेळेच्या अंतराने दोन अपघात घडले. यामध्ये तीन जण जखमी झाले.

Three injured in collision in Kosadani Ghat | कोसदणी घाटातील अपघातात तीन जखमी

कोसदणी घाटातील अपघातात तीन जखमी

Next


आर्णी : येथील कोसदणी घाटात शुक्रवारी सकाळी काही वेळेच्या अंतराने दोन अपघात घडले. यामध्ये तीन जण जखमी झाले.
पहिल्या अपघातात सकाळी ८.३० वाजता बापूराव दाभाडकर (६५) रा. माहूर हे आपल्या दुचाकीने माहूरला जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यांना हायवे पोलीस अजय डोके, रवींद्र खांदवे, चंद्रशेखर सवने व दीपक चातारकर यांनी प्रथम लोणबेहळ आरोग्य केंद्रात भर्ती केले व तेथून यवतमाळला हलविण्यात आले.
त्यानंतर दुसऱ्या एका अपघातात एमएच ४०-४१६३ हा ट्रक व सीजी ०४ जेबी ६४२७ या ट्रेलरची समारोसमोर धडक लागली. यामध्ये दोन्ही ट्रकचे चालक शे. हनीफ शे. ख्वाजा रा. नांदेड व मो. मुजीब मो. दाऊद रा. बिहार हे दोघे जखमी झाले. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three injured in collision in Kosadani Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.