यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यू ; ११७ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:03 PM2020-09-09T20:03:47+5:302020-09-09T20:04:11+5:30
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्या तीन जणांमध्ये आर्णी तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील २४ वर्षीय पुरुष आणि दिग्रस शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 117 जणांमध्ये 75 पुरुष असून 42 महिलांचा समावेश आहे. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, महागाव शहरातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील सात पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पुसद तालुक्यातील तीन पुरुष, राळेगाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील दोन पुरुष, वणी शहरातील 10 पुरुष व 13 महिला, यवतमाळ शहरातील 34 पुरुष व 13 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 966 अॅक्टिव्ह पॉझेटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये 315 जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 4664 झाली आहे. यापैकी 3255 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 127 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 284 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 135 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 57833 नमुने पाठविले असून यापैकी 54512 प्राप्त तर 3321 अप्राप्त आहेत. तसेच 49848 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.