जंगलात चराईसाठी तीन लाख मेंढ्यांना ‘नो एन्ट्री’
By admin | Published: July 9, 2014 11:52 PM2014-07-09T23:52:40+5:302014-07-09T23:52:40+5:30
वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर
मेंढपाळ संकटात : धनगरबांधव वनविभागावर धडकले
यवतमाळ : वनविभागाने जंगलात मेंढ्यांना चारण्यास मज्जाव केला असून तीन लाख मेंढ्यांना चारायचे कोठे असा प्रश्न मेंढपाळांपुढे पडला आहे. हा प्रश्न घेऊन शेकडो मेंढपाळ बुधवारी येथील मुुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकले. चराईची परवानगी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. तसेच धनगर समाज महासंघाच्यावीने एक निवेदनही देण्यात आले.
यवतमाळ जिल्हयात मेंढपापाल व्यवसाय करणारे दहा हजार कुटुंब आहेत. अनेक पिढ्यांपासून मेंढीपालन करीत आहेत. सध्यस्थितीत तीन लाख मेंढ्यांना गावोगावी फिरून चारा उपलब्ध करून दिला जातो. उन्हाळ्यात धरण आणि शेतीमध्ये चराईसाठी मेंढ्या बसविल्या जातात. मात्र पावसाळा येताच शेतशिवारात चराई करता येत नाही. त्याच वेळी वनविभाग जंगलात मेंढ्यांना शिरू देत नाही. अशा स्थितीत चराईचा मोठा प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मेंढपाळांनी वनविभागाच्या मुुख्य कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्य वनसंरक्षकांच्या वतीने निवेदन स्विकारणाऱ्या उपवनसंरक्षकांना जाब विचारण्यात आला. उपवनसंरक्षकांनी याबाबत १४ जुलैला तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी निवेदन सादर करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, उपाध्यक्ष रमेश महानुर, सचिव कृष्णराव कांबळे, डॉ. संदीप धवने, श्रीधर मोहड, अविनाश जानकर, गजानन डोमाळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)