डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:22 PM2018-02-27T23:22:34+5:302018-02-27T23:22:34+5:30

पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरखेड ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Three offenders with a doctor's dacoity | डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा

डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देकंपाऊंडरची आत्महत्या : नातेवाईक धडकले उमरखेड ठाण्यावर

ऑनलाईन लोकमत
उमरखेड : पॅथॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर दाम्पत्यासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उमरखेड ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या तिघांच्या अटकेसाठी मृतांच्या नातेवाईकांनी उमरखेड ठाण्यात मंगळवारी ठिय्या दिला.
डॉ.जयशंकर जवने, वर्षा जयशंकर जवने आणि डॉ. महेश चिन्नावार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक डॉ. जवने यांच्या पॅथॉलॉजीमध्ये रुपेश रोहिदास राठोड (२४) हा तरुण कंपाऊंडर म्हणून कामाला होता. सोमवारी दुपारी त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून या तिघांनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे पुढे आले. रुपेश हा या पॅथॉलॉजीमध्ये तीन वर्षांपासून काम करीत होता. दोन महिन्यांपासून त्याचा पगार दिला नाही. वारंवार पैशाची मागणी केली तेव्हा लॅबमधील एक लाख रुपयांचा घोटाळा केला आहे, पैसे फिटेपर्यंत पगार मिळणार नाही, असे सांगितले. या घोटाळ्याच्या आरोपाने अपमानित झालेल्या रुपेशने आत्महत्या केल्याचे पुढे आले. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान या तिघांनाही तत्काळ अटक करा, अशी मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी उमरखेड ठाण्यात ठिय्या दिला. त्यामुळे वातावरण तापले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी समजूत घालून नातेवाईकांना शांत केले.

Web Title: Three offenders with a doctor's dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.