पुन्हा डेल्टा विषाणू संसर्गाचे तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:38+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील हादगाव येथे एक, कापरा मेथोड येथे एक, जगदीपूर येथे पाच, दिग्रस तालुक्यात देवार्जी पाच, सेवानगर एक व पुसदमध्ये एक रुग्ण आढळला होता. हे रुग्ण उपचार घेवून बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान माहूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता नव्याने नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा येथे एक आणि महागाव येथे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जगाने धास्ती घेतलेल्या डेल्टा विषाणू संसर्गाचा प्रकोप यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाला आहे. यापूर्वी शासकीय रुग्णालयात १५ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले आहेत. महागाव तालुक्यातील रुग्णालयात दोन तर नेर रुग्णालयात एक रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील हादगाव येथे एक, कापरा मेथोड येथे एक, जगदीपूर येथे पाच, दिग्रस तालुक्यात देवार्जी पाच, सेवानगर एक व पुसदमध्ये एक रुग्ण आढळला होता. हे रुग्ण उपचार घेवून बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान माहूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता नव्याने नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा येथे एक आणि महागाव येथे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेल्टा विषाणू संसर्ग हा कोरोनापेक्षाही भयंकर मानला जातो. सद्यस्थितीत मेडिकलच्या डाॅक्टरांनी डेल्टा संसर्ग असलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार केले आहेत. डेल्टा विषाणूची संसर्ग पसरविण्याची क्षमता कोरोनापेक्षा दुप्पट मानली जाते. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असतानाच डेल्टा विषाणूचा कहर येतो की काय अशी भीती व्यक्त केली जात असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. उपाययोजना कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्याच्या तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्येही ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयातही ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. बालकांवर अतिदक्षता उपचार करणाऱ्या कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे. एकंदरच आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दर १५ दिवसांनी डेल्टा संशयित रुग्णाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले जात आहेत.
या विषाणूच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेला बराच अवधी लागतो. विविध प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच डेल्टा विषाणू संसर्ग झाल्याचे उघड होते. त्यामुळे प्रत्येकानेच सतर्क राहणे गरजेचे आहेत.
महागाव व नेर तालुक्यात सर्वेक्षण
डेल्टा विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी महागाव आणि नेर तालुक्यांमध्ये सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. शुक्रवारपासून ही मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. लाट येण्यापूर्वीच संसर्गाची साखळी कशी तोडता येईल यावर आरोग्य यंत्रणा काम करत आहे.