विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:02 AM2017-12-13T10:02:29+5:302017-12-13T10:02:51+5:30

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

Three suicides with a farmer woman in different places in Vidarbha | विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

विदर्भात विविध ठिकाणी शेतकरी महिलेसह तिघांची आत्महत्या

Next
ठळक मुद्देआर्थिक विवंचना हे प्रमुख कारण

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ/अमरावती/वर्धा : सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे नैराश्य आल्याने अमरावती जिल्ह्यातील एका शेतकरी वृध्द महिलेसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कुटुंबातील वृद्धेने आर्थिक विवंचनेत मंगळवार, दि. १२ रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व मुलाचे मागील काही वर्षांपासूनचे आजारपण यामुळे ८२ वर्षीय वृद्ध महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. अन्नपूर्णा माणिकराव तिडके असे तिचे नाव आहे.
मुलाचे आजारपण आणि चार मुलींचे लग्न यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. त्यातच सततची नापिकी व सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे कर्जही होते. यावर्षी सोयाबीन व भेंडीच्या उत्पादनात तोटा झाला. घराची जबाबदारी अन्नपूर्णा तिडके यांच्यावर आली होती.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दाभा (मानकर) येथे रवी सवाईराम राठोड (४० ) या शेतकऱ्याने सोमवारी रात्री विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जाचे हप्ते थकल्याने खाजगी कंपनी कर्ज भरण्याचा तगादा लावत होती. त्यातच नापिकी झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील सतीश लक्ष्मण मसराम (३२) या युवा शेतकऱ्याने कर्जमाफीला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर कर्जावर घेतला होता. शिवाय बँकेचे तथा खासगी कर्ज होते. शेतीच्या मिळकतीतून कर्जाची परतफेड होत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: Three suicides with a farmer woman in different places in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.